बीड - दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शनिवारी शपथ घेतली. त्यानंतर बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तसेच 'अजीत दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
मागील एका महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून घोळ सुरु होता. अखेर शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तीक निर्णय असल्याचे शरद पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनेक ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे भाजप कार्यकर्त्यांनी 'अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा दिल्या.