बीड - माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील भगवान भक्ती गड येथे ऑनलाइन दसरा मेळावा दरम्यान नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सध्या कोरोनाची बिकट परिस्थिती असताना व जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही शेकडो लोक एकत्र जमवल्यावरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर पाटोदा तालुक्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरवर्षी सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर माजी मंत्री पंकजा मुंडे ऊसतोड मजुरांचा मिळावा घेत असतात. यंदा हा मेळावा ऑनलाइन घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. मात्र रविवारी प्रत्यक्ष मेळावा घेतला तेव्हा शेकडो लोक भगवान भक्ती गडावर जमा झाले. सध्या बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. अशा स्थितीत कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी लोकांना एकत्र करून धोका निर्माण करू नये. असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने दिलेले आहेत. मात्र रविवारी जेव्हा भगवान भक्ती गडावर ऑनलाईन दसरा मेळावा सुरू झाला. तेव्हा व्यासपीठावर व व्यासपीठाच्या बाजूने शेकडो लोक जमा झाले होते. यावरून कोविड व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पाटोदा तालुक्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग -
सध्या सर्वत्र कोरोनाची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा स्थितीत अनेक लोक एकत्र येऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांचे आहेत. मात्र, या नियमांचे उल्लंघन झालेले दिसले. यावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असल्याचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी सांगितले.
ऑनलाइन मेळावा प्रकरण: कोविड प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत पंकजा मुंडेंवर गुन्हा दाखल - बीड पंकजा मुंडे गुन्हा दाखल बातमी
सध्या बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. अशा स्थितीत कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी लोकांना एकत्र करून धोका निर्माण करू नये. असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने दिलेले आहेत. मात्र रविवारी जेव्हा भगवान भक्ती गडावर ऑनलाईन दसरा मेळावा सुरू झाला. तेव्हा व्यासपीठावर व व्यासपीठाच्या बाजूने शेकडो लोक जमा झाले होते. यावरून कोविड व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पाटोदा तालुक्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.