ETV Bharat / state

भाजपा नेते आशिष शेलार यांनी घेतली जखमी शेतकऱ्याची भेट - किनगाव शेतकरी मारहाण प्रकरण

बी बियाणे खरेदीसाठी निघालेल्या शेतकऱ्याला अडवून पोलिसांनी मारहाण केल्याची घटना सोमवार रोजी घडली होती. या घटने संदर्भांचे वृत्त समजताच भाजपाचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी आज सकाळी १० वाजता गेवराई तालुक्यातील किनगाव येथील जखमी शेतकरी मोतीराम चाळक यांची घरी जाऊन भेट घेत घडलेल्या प्रकाराची चौकशी करून विचारपुस केली.

भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली जखमी शेतकऱ्याची भेट

author img

By

Published : Jun 2, 2021, 4:06 PM IST

Updated : Jun 2, 2021, 8:46 PM IST

बीड - बी बियाणे खरेदीसाठी निघालेल्या शेतकऱ्याला अडवून पोलिसांनी मारहाण केल्याची घटना सोमवार रोजी घडली होती. या प्रकारानंतर या घटनेची माहिती आमदार लक्ष्मण पवारांना मिळताच या घटनेबद्दल पोलिसांची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले होते. या घटने संदर्भांचे वृत्त समजताच भाजपाचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी आज सकाळी १० वाजता गेवराई तालुक्यातील किनगाव येथील जखमी शेतकरी मोतीराम चाळक यांची घरी जाऊन भेट घेत घडलेल्या प्रकाराची चौकशी करून विचारपूस केली. यावेळी आशिष शेलार यांच्यासोबत आमदार लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गावचे सरपंच तथा शेतकरी नेत्या पूजा मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली जखमी शेतकऱ्याची भेट
भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली जखमी शेतकऱ्याची भेट

गरीब जगाच्या पोशींद्याला मारहाण

यावेळी पत्रकारांशी वार्तालाभ करताना आशिष शेलार म्हणाले, बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेल्या माझ्या बळीराजाला तुम्ही मारता हे कदापी सहन केले जाणार नाही. एकिकडे शासन कोरोना महामारीसाठी उपाययोजना करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रशासन शेतकऱ्याना बियाणे खरेदीसाठी कृषी दुकान उघडण्याची परवानगी देत आहे. दुसरीकडे पोलीस प्रशासन लॉकडाऊनच्या नावाखाली गरीब शेतकऱ्याना रस्त्यात अडवून मारहाण करत आहे. गेवराई तालुक्यात होत असलेली अवैध वाळु तस्करी अवैध धंदे बंदसाठी पोलीस कारवाई करत नाही. परंतु गरीब जगाच्या पोशीद्याला मारहाण करत असून हे कदापी सहन केले जाणार नाही.

मी स्व:त मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेवून निवेदन देऊन संबधीत पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती भाजपा नेते शेलार यांनी दिली.

Last Updated : Jun 2, 2021, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.