बीड - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव मान्य असल्याची भूमिका जाहीर केली. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत पुरेशा संख्याबळाअभावी पराभव मान्य आहे, फक्त प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवणार असे सांगितले आहे.
-
राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2020राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2020
हेही वाचा - बीडमध्ये निराधारांची हेळसांड; ५ हजारावर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषदांमध्येही आघाडी झाली आहे. त्यामुळे भाजपला काही जिल्हा परिषद गमवाव्या लागल्या आहेत. आता बीड जिल्हा परिषदेतही असेच चित्र पाहायला मिळत आहे.
- जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल -
- राष्ट्रवादी - 19
- भाजप - 19
- शिवसेना - 04
- काँग्रेस - 03
- काकू-नाना आघाडी - 02
- अपक्ष - 02
- शिवसंग्राम - 04 (सर्व सदस्य भाजपमध्ये)