ETV Bharat / state

बीड जिल्हा परिषद : शिवसेनेला सभापतीपद देण्याच्या विरोधात गट सक्रिय?

भाजपचे वर्चस्व असलेल्या बीड जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने एकत्र येत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीने आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. नुकतेच जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा पदभार पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय शिवकन्या शिरसाट अध्यक्ष तर बजरंग सोनवणे यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार घेतला आहे.

beed zilla parishad
बीड जिल्हा परिषद
author img

By

Published : Jan 18, 2020, 10:44 PM IST

बीड - मिनी मंत्रालय असलेल्या येथील जिल्हा परिषदमध्ये वाट्याला महत्वाचे सभापतीपद यावे यासाठी महाविकास आघाडीतील अनेकांनी 'टाईट फिल्डींग' लावली आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 4 सदस्य आहेत. म्हणून शिवसेनेला सभापती पद मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सक्रिय झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये सभापती निवडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या 24 जानेवारीला सभापती निवडीची प्रक्रिया होणार आहे. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - 'देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता समुपदेशन करण्याची गरज'

भाजपचे वर्चस्व असलेल्या बीड जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने एकत्र येत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीने आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. नुकतेच जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा पदभार पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय शिवकन्या शिरसाट अध्यक्ष तर बजरंग सोनवणे यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार घेतला आहे. आता 24 डिसेंबर रोजी सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या दरम्यान महाविकास आघाडीतील 4 सदस्य असलेल्या शिवसेनेला सभापतीपद देऊ नये, यासाठी राष्ट्रवादीतील एक मोठा गट सक्रिय झाला आहे.

सभापती निवडीमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाला 2 समित्या तर संदीप क्षीरसागर यांच्या गटाकडे 1 समितीचे सभापती पद देण्याची शक्यता आहे. यामध्ये विशेष म्हणजे बांधकाम विभाग मिळविण्यासाठी अनेकांनी ताकद लावली आहे. नुकतेच काँग्रेसचे संजय दौंड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला आमदारकी दिली आहे. 3 सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसला देखील सभापती पदासाठी डावलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने

तीन पदांसाठी होणार निवडणूक -

जिल्हा परिषदेत ५ विषय समित्या आहेत. यात समाजकल्याण आणि महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी त्या समितीच्या नावाने निवडणूक होते. समाजकल्याण समितीसाठी मागासप्रवर्गातील व्यक्ती अर्ज भरू शकते तर महिला बालकल्याण समितीसाठी महिलाच अर्ज भरू शकतात. या समित्यांच्या निवड झाल्यानंतर विषय समित्यांचे 2 सभापती निवडून देण्यासाठी निवडणूक होईल. यात कोणताही सदस्य उमेदवारी दाखल करू शकतो. उपाध्यक्षाला कोणती तरी 1 समिती द्यावी लागते. समाजकल्याण आणि महिला बालकल्याण या 2 समित्यांसाठी सभापती निवडून आल्यानंतर इतर 2 समिती सभापती आणि उपाध्यक्ष यांच्यात समित्यांचे वाटप जिल्हापरिषद अध्यक्ष करतात.

Intro:बीड झेडपी; शिवसेनेला सभापती पद देण्याच्या विरोधात राष्ट्रवादीतील मोठा गट विरोधात

बीड- मिनी मंत्रालय असलेल्या बीड झेडपी मध्ये सभापती निवडीत आपल्या वाट्याला महत्वाचे सभापती पद यावे यासाठी महाविकास आघाडीतील अनेकांनी 'टाईट फिल्डींग' लावली आहे. मात्र 4 जिल्हा परिषद सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेला सभापती पद मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सक्रिय झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये सभापती निवडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या 24 जानेवारी रोजी सभापती निवडीची प्रक्रिया होणार आहे. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भाजपचे वर्चस्व असलेल्या बीड जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने एकत्र येत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सत्ता आल्यानंतर बीड झेडपीत महाविकास आघाडीने आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. नुकतेच झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा पदभार पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय शिवकन्या शिरसाट अध्यक्ष तर बजरंग सोनवणे यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार घेतला आहे. आता 24 डिसेंबर रोजी सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या दरम्यान महाविकास आघाडीतील 4 जिल्हा परिषद सदस्य असलेल्या शिवसेनेला सभापतीपद देऊ नये यासाठी राष्ट्रवादीतील एक मोठा गट सक्रिय झाला आहे. सभापती निवडीमध्ये आ. प्रकाश सोळंके यांच्या गटाला दोन समित्या तर संदीप क्षीरसागर यांच्या गटाकडे 1 समितीचे सभापती पद देण्याची शक्यता आहे. यामध्ये विशेष म्हणजे बांधकाम विभाग मिळविण्यासाठी अनेकांनी ताकद लावली आहे. नुकतेच कॉग्रेस चे संजय दौंड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉग्रेसने कॉग्रेस ला आमदारकी दिली आहे. तीन सदस्य संख्या असलेल्या कॉग्रेसला देखील सभापती पदासाठी डावलण्याची श्यक्यता आहे..

तीन पदांसाठी होणार निवडणूक-

जिल्हा परिषदेत ५ विषय समित्या आहेत. यात समाजकल्याण आणि महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी त्या समितीच्या नावाने निवडणूक होते. समाजकल्याण समितीसाठी मागासप्रवर्गातील व्यक्ती अर्ज भरू शकते तर महिला बालकल्याण समितीसाठी महिलाच अर्ज भरू शकतात . या दोन समित्यांच्या निवडी झाल्यानंतर विषय समित्यांचे दोन सभापती निवडून देण्यासाठी निवडणूक होईल, यात कोणताही सदस्य उमेदवारी दाखल करू शकतो. उपाध्यक्षाला कोणतीतरी एक समिती द्यावी लागते. समाजकल्याण आणि महिला बालकल्याण या दोन समित्यांसाठी सभापती निवडून आल्यानंतर इतर दोन समिती सभापती आणि उपाध्यक्ष यांच्यात समित्यांचे वाटप जिल्हापरिषद अध्यक्ष करतात.

Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.