ETV Bharat / state

'एका पुतण्याने धोका दिला म्हणून काय झालं, हजारो पुतणे माझ्याबरोबर आहेत' - beed constituency election 2019

बीड विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत केलेली तीन कामे सांगा म्हटलं तर सांगता येणार नाहीत, असे लोक माझ्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. या सगळ्या बाबींवर मी जास्त बोलण्याची गरज नाही, कारण जनता सर्व जाणते आहे. संयमाच्या व विश्वासाच्या राजकारणाला नेहमीच बीडच्या जनतेने बळ दिले आहे. आजही मला विश्वास आहे, की या निवडणुकीत जनता ढोंगी लोकांना त्यांची जागा दाखवेल. असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना उमेदवार जयदत्त क्षीरसागर मुलाखत
author img

By

Published : Oct 15, 2019, 6:15 PM IST

बीड - माझ्या रक्ताच्या नात्यातल्या पुतण्याने मला धोका दिला म्हणून काय झालं, आज बीड विधानसभा मतदारसंघातील हजारो पुतणे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर काम करत आहेत, असा विश्वास बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.

शिवसेना उमेदवार जयदत्त क्षीरसागर मुलाखत

हेही वाचा - संकल्प भाजपचा : महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसह सावरकरांना देणार 'भारतरत्न'

बीड विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या, या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. यानिमित्ताने घेतलेल्या मुलाखतीत जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांचा समाजसेवेचा वसा व वारसा घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी राजकारण करत आहोत. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे सूत्र कायम आमच्या राजकारणाचे राहिले आहे. ज्या विरोधकांचा समाजात पत्ता नाही असे स्वतःला नेते समजून घेणारे लोक आमच्यावर चिखलफेक करत आहेत. मला माझ्या रक्ताच्या नात्यातील पुतण्याने जरी धोका दिला असला, तरी बीड विधानसभा मतदारसंघात आज हजारो पुतणे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्याशी जोडले असून माझ्याबरोबर काम करत आहेत.

हेही वाचा - नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे

बीड विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत केलेली तीन कामे सांगा म्हटलं तर सांगता येणार नाहीत, असे लोक माझ्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. या सगळ्या बाबींवर मी जास्त बोलण्याची गरज नाही, कारण जनता सर्व जाणते आहे. संयमाच्या व विश्वासाच्या राजकारणाला नेहमीच बीडच्या जनतेने बळ दिले आहे. आजही मला विश्वास आहे की, या निवडणुकीत जनता ढोंगी लोकांना त्यांची जागा दाखवेल. असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बीड विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या होत असलेल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे बीड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते गावागावांमध्ये जाऊन जयदत्त क्षीरसागर यांचा प्रचार करत आहेत. याशिवाय प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी आपापली रणनीती आखत प्रचाराला वेग घेतला आहे.

हेही वाचा - दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अन् बरंच काही...भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध

पश्चिमी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणणार-

कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सक्षम आहे. येणाऱ्या काळात मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणार आहे. इथला शेतकरी सुखी झाला पाहिजे, यासाठी सिंचन व्यवस्थेला शिवसेना महत्व देत आलेली आहे. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

Intro:( माननीय संपादक साठे सर यांच्या सूचने प्रमाणे खालील बातमी व मुलाखत व्हिडिओ पाठवत आहे)

एका पुतण्याने धोका दिला म्हणून काय झालं हजारो पुतणे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर आलेत- जयदत्त क्षीरसागर

बीड- माझ्या रक्ताच्या नात्यातल्या पुतण्याने मला धोका दिला म्हणून काय झालं आज आज बीड विधानसभा मतदार संघातील हजारो पुतणे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर काम करत आहेत असा विश्वास बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला आहे.

Body:बीड विधानसभा मतदार संघात काका विरुद्ध पुतण्या, या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस कडून संदीप क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. यानिमित्ताने घेतलेल्या मुलाखतीत जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांचा समाजसेवेचा वसा व वारसा घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी राजकारण करत आहोत. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे सूत्र कायम आमच्या राजकारणाचे राहिले आहे. ज्या विरोधकांची समाजात पत नाही असे स्वतःला नेते समजून घेणारे लोक आमच्यावर चिखलफेक करत आहेत. मला माझ्या रक्ताच्या नात्यातील पुतण्याने जरी धोका दिला असला, तरी बीड विधानसभा मतदारसंघात आज हजारो पुतणे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्याशी जोडले असून माझ्याबरोबर काम करत आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत केलेली तीन कामे सांगा म्हटलं तर सांगता येणार नाहीत, असे लोक माझ्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. या सगळ्या बाबी वर मी जास्त बोलण्याची गरज नाही, कारण जनता सर्व जाणते आहे. संयमाच्या व विश्वासाच्या राजकारणाला नेहमीच बीडच्या जनतेने बळ दिले आहे. आजही मला विश्वास आहे की, या निवडणुकीत जनता ढोंगी लोकांना त्यांची जागा दाखवेल. असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Conclusion:बीड विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या होत असलेल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे बीड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते गावागावांमध्ये जाऊन जयदत्त क्षीरसागर यांचा प्रचार करत आहेत. याशिवाय प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी आपापली रणनीती आखत प्रचाराला वेग घेतला आहे.

पश्चिमी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणणार-

कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सक्षम आहे. येणाऱ्या काळात मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणार आहे. इथला शेतकरी सुखी झाला पाहिजे, यासाठी सिंचन व्यवस्थेला शिवसेना महत्व देत आलेली आहे. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे, जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.