ETV Bharat / state

परळीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेला वाळूचा टिप्पर वाळू माफियांनी मध्यरात्रीच पुन्हा पळवला.. - beed

परळीमध्ये वाळूमाफियांचा मुजोरपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेला वाळूचा टिप्पर तहसील कार्यालयाच्या परिसरातून वाळूमाफियांनी मध्यरात्रीच पळवल्याची घटना घडली.

परळीत वाळूमाफियांचा मुजोरपणा
author img

By

Published : Jun 1, 2019, 5:16 PM IST

बीड - परळीमध्ये वाळूमाफियांचा मुजोरपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील पोलीस व महसूल प्रशासनाचा कसलाच दबदबा राहिला नसल्याचा प्रत्यय शनिवारी आला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेला वाळूचा टिप्पर तहसील कार्यालयाच्या परिसरातून वाळूमाफियांनी मध्यरात्रीच पळवल्याची घटना घडली. याप्रकणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

परळी तालुक्यात गंगाखेड, सोनपेठ, दिग्रस आदी भागातून गोदावरीच्या पात्रातील वाळूची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. शुक्रवारी रात्री परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर पकडला. त्यानंतर वाळूने भरलेला टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञात लोकांनी तहसीलमध्ये कामावर असलेल्या कोतवालाला मारहाण करून वाळूने भरलेला टिप्पर पळवून नेला.

याप्रकरणी, परळी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. वाळूने भरलेले टिप्पर स्वतः मालकाने पळवून नेला आहे, की अज्ञात व्यक्तीने पळवला याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. देविदास शेळके एपीआय डोंगरे करत आहेत. टिप्परमधील वाळूची किंमत अंदाजे २४ हजार रुपये एवढी होती.

१५ दिवसांपूर्वी बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गेवराई तालुक्यात वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर आता परळीत महसूल प्रशासनाने कारवाई केली. मात्र, वाळू माफियामध्ये महसूल विभागाचा दबदबा राहिला नाही. महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच वाळू तस्करी सुरू आहे. यामध्ये पोलीस देखील मागे नाहीत. वाळूच्या पकडलेल्या गाड्या चिरीमिरी घेऊन सोडून दिल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही समोर आलेले आहेत. एवढेच नाही तर गेवराईमध्ये जेव्हा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः कारवाई केली तेव्हा वाळूमाफियांचा कारभार चव्हाट्यावर आला होता. या कारवाईनंतर सर्वच प्रशासनातील अधिकारी उघडे पडले होते. परळी येथे वाळूमाफियांनी तहसील कार्यालय परिसरातून टिप्पर पळवून नेण्याचा प्रकार गंभीर असून, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Intro:खालील बातमीचे फोटो व विजवल मेल केले आहेत.....
*************

उपजिल्हाधिकारी यांनी पकडलेल्या पकडलेले वाळूचे टिप्पर माफियांनी मध्यरात्री पुन्हा नेले पळवून

बीड- जिल्ह्यातील पोलिस व महसूल प्रशासनाचा कसलाच दबदबा राहिलेला नसल्याचा प्रत्यय शनिवारी आला. चक्क उपजिल्हाधिकारी परळी यांनी पकडलेले वाळूचे टिप्पर तहसील कार्यालयाच्या परिसरातून वाळूमाफियांनी मध्यरात्रीच पुन्हा पळवल्याची घटना परळी येथे घडली आहे. याबाबत परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Body:परळी तालुक्यात गंगाखेड, सोनपेठ, दिग्रस आदी भागातून गोदावरीच्या पात्रातील वाळूची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. शुक्रवारी रात्री परळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या पथकाने एक टिप्पर वाळू वाहतूक करत असताना पकडले. टिप्पर पथकाने रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पकडले व सदरील वाळू वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते वाळूने भरलेले टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावण्यात आले. टिप्पर मधील वाळूची किंमत अंदाजे 24 हजार रुपये एवढी होती. शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञात लोकांनी तहसील परिसरात रात्रीच्या वेळी कामावर असलेल्या कोतवालाला मारहाण करून वाळू ने भरलेले ते टिपर पळवून नेले. पथकाने दिलेल्या फिर्यादीनुसार परळी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून वाळूने भरलेल्या टिप्पर स्वतः मालकाने पळवून नेला आहे की, कोणी अज्ञात व्यक्तीने पळवला याचा नेमका तपास शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. देविदास शेळके एपीआय डोंगरे करत आहे.

Conclusion:पंधरा दिवसांपूर्वी बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गेवराई तालुक्यात वाळू माफिया वर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर आता परळीत महसूल प्रशासनाने कारवाई केली. मात्र वाळू माफिया मध्ये महसूल विभागाचा दबदबा राहिला नाही. महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच वाळू तस्करी सुरू आहे. यामध्ये पोलीस देखील मागे नाहीत वाळूच्या पकडलेल्या गाड्या चिरीमिरी घेऊन सोडून दिल्याचे यापूर्वी अनेक प्रकार समोर आलेले आहेत. एवढेच नाही तर गेवराई मध्ये जेव्हा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः कारवाई केली तेव्हा वाळूमाफियांचा कारभार चव्हाट्यावर आला होता. या कारवाईनंतर सर्वच प्रशासनातील अधिकारी उघडे पडले होते. परळी येथे वाळूमाफियांनी तहसील कार्यालय परिसरातून टिप्पर पळून देण्याचा प्रकार गंभीर असून याकडे जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.