ETV Bharat / state

बीडमध्ये जनसामान्यांना खाकीचा धाक; वाळू माफियांना मात्र अभय - beed police news

कोरोनाच्या या बिकट काळात प्रत्येक जण तणावात आहे. कोणी आपल्या नातेवाईकांना गोळ्या-औषध आणून देण्यासाठी घराबाहेर पडत आहे तर कोणी दवाखान्यात तपासणीसाठी चालले आहे. आशा परिस्थितीत चौकामध्ये आले की, पोलीस आडवून दंडात्मक कारवाई करतात. याबाबत काही म्हटले की, पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षक आर. राजा यांचे नाव सांगतात. पोलिसांना दंडात्मक कारवाईचे लक्ष पोलीस अधीक्षकांनी दिले असल्याचीही माहिती समोर येत आहेत.

beed police and sand mafia latest news
बीड पोलिसांचे वाळू माफियांना अभय
author img

By

Published : May 26, 2021, 9:01 AM IST

बीड - शहरातून क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून टिप्परची वाहतूक सर्रास सुरू आहे. या वाळूच्या टिप्परची साधी चौकशी देखील पोलीस करत नाहीत. याउलट गावाकडचा साधा शेतकरी दिसला की, आडवून दंडाच्या पावत्या द्यायच्या. हा एकमेव कार्यक्रम बीड पोलिसांनी निर्बंधाच्या नावाखाली सुरू केला आहे. एवढेच नाही तर डॉक्टर, नर्स अथवा इतर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना अडवून लायसन्सच्या नावाखाली कधी अडवणूक करायची तर कधी आरेरावी करायची, असा कारभार सुरू आहे. एवढेच नाही तर मंगळवारी काही दूध व्यावसायिकांनाही पोलिसांनी बदडून काढले आहे. सर्वसामान्यांना खाकीचा धाक दाखवणे सुरु आहे. तर वाळू माफियाला अभय दिले आहे.

बीड पोलिसांचे वाळू माफियांना अभय

पोलिसांना दंडात्मक कारवाईचे लक्ष -

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी पोलिसांचे नाके उभारले आहेत. कोरोनाच्या या बिकट काळात प्रत्येक जण तणावात आहे. कोणी आपल्या नातेवाईकांना गोळ्या-औषध आणून देण्यासाठी घराबाहेर पडत आहे तर कोणी दवाखान्यात तपासणीसाठी चालले आहे. आशा परिस्थितीत चौकामध्ये आले की, पोलीस आडवून दंडात्मक कारवाई करतात. याबाबत काही म्हटले की, पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षक आर. राजा यांचे नाव सांगतात. पोलिसांना दंडात्मक कारवाईचे लक्ष पोलीस अधीक्षकांनी दिले असल्याचीही माहिती समोर येत आहेत. एकंदरीत अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधाराची आवश्यकता आहे. मात्र बीडमध्ये जिल्हा प्रशासन सर्वसामान्य नागरिकांची कोंडी करत आहे.

पोलिसांचा अनागोंदी कारभार थांबवा - पालकमंत्र्यांकडे मागणी

सध्या शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत गावाकडून आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना पोलीस आडवून दंडात्मक कारवाई करत आहेत. याशिवाय अनेक अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांच्याकडून दंडाच्या पावत्या फाडल्या जात आहेत. एकंदरीत बीड पोलिसांकडून सुरू असलेला अनागोंदी कारभार थांबला नाही तर याचा त्रास गोरगरीब नागरिकांना होत राहील. या समस्येकडे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर यांनी केली आहे.

पोलिसांच्या जुलमी कारभाराला शेतकरी वैतागले -

सध्या सर्वत्र खरीप पेरणीची तयारी शेतकरी करत आहेत. खत- बियाणे घेऊन जाण्यासाठी बीड शहरात यावे लागते. मात्र बीडमध्ये येताच शेतकऱ्यांना अगोदर पोलिसांना तोंड द्यावे लागते. अनेक शेतकरी या पोलिसांच्या जुलमी कारभाराला वैतागले आहेत. एवढेच नाही तर विना नंबरच्या अनेक वाळूच्या हायवा पोलिसांच्या समोरून जातात. पोलिस त्यांना अडवत नाहीत. मात्र गावाकडच्या शेतकरी असलेल्या दुचाकीस्वारांना अडवून दंडात्मक कारवाई करतात. एवढेच नाही तर अनेक वेळा आरेरावी देखील शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. या समस्येबाबत पोलीस प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाची बाजू समजू शकली नाही.

हेही वाचा - काय सांगता...कराचा भरणा केल्यास मिळणार एक तोळे सोन्याची चैन, पैठणी आणि बरेच काही!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.