ETV Bharat / state

बीड कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनामुळे निधन - बीड कोरोना मृत्यू

जिल्हा कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकांची तीन दिवसांपूर्वी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.

प्रतिकात्म फोटो
प्रतिकात्म फोटो
author img

By

Published : Nov 4, 2020, 2:20 PM IST

बीड - जिल्हा कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकांचे बुधवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. तीन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आल्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाचे उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे अकाली निधन

ते यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवाशी आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे बीड जिल्ह्यात ते सर्वपरिचित होते. अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवला होता. मुंबई येथे तिहार कारागृहात कार्यरत असताना कुख्यात दहशतवादीवाद्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांनी संभाळली होती. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबाबत त्यांना कारागृह विभागाकडून महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. प्रभावी वक्तृत्व व कारागृहातील कैद्यांची मानसिकता बदलणारा अधिकारी त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.