ETV Bharat / state

सांगा आता जगायचं कसं? बीडच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

author img

By

Published : Jun 24, 2020, 5:39 PM IST

बीड जिल्ह्यात दरवर्षी साडेतीन लाख हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. यंदादेखील मृग नक्षत्रातील पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. बाजारातून सोयाबीनचे बियाणे विकत आणले मात्र, सोयाबीन शेतात उगवली नाही. म्हणून शेतकऱ्यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

farmer crisis
सांगा आता जगायचं कसं? बीडच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

बीड - सोयाबीनची पेरणी करून आठ दिवस झाले. पेरलेले बियाणे आज उगवेल, उद्या उगवेल याची वाट पाहून थकलो मात्र पेरलेले बी काही उगवलं नाही. आता आमच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अगोदरच आर्थिक संकट आमच्या समोर उभे असताना आता नव्याने पेरणी करायची कशी? सांगा आता आम्ही जगायचं कसं? असा प्रश्न बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सोयाबीन बियाणातील बोगसगिरी समोर आल्यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत.

बीड जिल्ह्यात दरवर्षी साडेतीन लाख हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. यंदादेखील मृग नक्षत्रातील पाऊस पडतात शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. बाजारातून सोयाबीनचे बियाणे आणलं व काळ्‍या आईची ओटी भरली. सोयाबीनची पेरणी करून आता आठ दिवसापेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र, अजूनही सोयाबीन उगवून आलं नाही. हा प्रकार बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडलेला आहे. काही शेतकऱ्यांनी पाच बॅग तर काहींनी दहा बॅग सोयाबीनची पेरणी केली. बीड तालुक्यातील वरवटी येथील शेतकरी नवनाथ कोठुळे यांनी पाच एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली. पेरणी करून आठ दिवस उलटले मात्र अजूनही पेरलेले उगवलेलं नाही. आता झालेला खर्च व आता दुपार पेरणीसाठी नवीन बियाणे-खत विकत घेण्यासाठी होणारा खर्च याचा ताळमेळ बसणार कसा? हा प्रश्न कोठुळे यांच्यासमोर अगदी डोंगरा सारखा उभा आहे. कोठुळे यांच्यासारखे शेकडो शेतकरी सोयाबीन बियाणाच्या बोगसगिरीमुळे हतबल झाले आहेत.

हेक्‍टरी 25 हजाराची मदत द्या -

ज्या शेतकऱ्यांचे बोगस बियाणांमुळे नुकसान झाले आहे त्याचे तत्काळ पंचनामे करून, त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये एवढी मदत सरकारने तत्काळ द्यावी कारण आता दुबार पेरणी करायची म्हटल्यावर देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी संकटात सापडलेला आहे. ज्या कंपन्यांनी संगणमत करून बाजारात बोगस बियाणे आणले आहे. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करा व शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची तात्काळ मदत द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल वायकर यांनी केली आहे.

पंचनामे करण्याचे काम सुरू -

ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन उगवले नसल्याबाबत तक्रारी आहेत. त्यांचे पंचनामे करण्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती नेमली असून, पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये बीड तालुक्यात मंगळवारी 30 शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यांचे पंचनामे आम्ही करत आहोत. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.