बीड जिल्ह्यात एकूण 20 लाखांहून अधिक मतदार आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील 233 मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेब कास्टिंग असल्याचे पाहायला मिळाले. एकूण 2325 मतदान केंद्रावर गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान मतदान प्रक्रिया सुरू झाली. 233 मतदान केंद्राच्या ठिकाणी वेब कास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहेत. 37 मतदान केंद्र अतिसंवेदनशील व संवेदनशील प्रकारात येत असल्याने तेथे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या उन्हाची तीव्रता असल्याने सकाळच्या टप्प्यात अधिक वेगाने मतदान होण्याची शक्यता आहे.
* 5.00 सायंकाळी ५८.३५ टक्के मतदान
* 2.00 - दुपारी १ वाजेपर्यंत बीड मतदारसंघात ३६ टक्के मतदान
* 11.30 - बीडमधील कुंभारी गावाचा मतदानावर बहिष्कार, ११ वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान
* 10.30 - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मतदानापूर्वी वैद्यनाथाचे घेतले दर्शन
* 10.10 - बीड मतदारसंघात ९ वाजेपर्यंत ७.५५ टक्के मतदानाची नोंद
* 9.45 - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी केज तालुक्यातील सारणी येथे बजावला मतदानाचा हक्क
* 9.45 - ज्या-ज्या ठिकाणी मतदान यंत्रांत बिघाड झाला आहे. त्या ठिकाणी शिल्लक असलेली यंत्रे तत्काळ जोडण्यात आली आहेत....एकून 70 ठिकाणी टेस्टिंग दरम्यान अडथळा आला होता. मात्र, प्रशासनाची तयारी असल्याने सर्व ठिकाणी सुरळीत मतदान सुरू आहे...अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
* 9.36 - माजलगाव तालुक्यातील आलापूर बुथ क्रमांक १५८
मशिनमध्ये बिघाडामुळे १ तासापासून मतदान सुरु नाही... 37 लोकांनी मतदान केल्यानंतर मशीन बंद पडले....आता झोनल अधिकारी केंद्रावर आलेले असून समस्या सोडलण्याचे काम सुरू आहे..
* 9.30 - धारुर तालुक्यातील मोहखेड बुथ क्रमांक ३१२
टेस्टिंग दरम्यानच मशिन मध्ये बिघाड झाला होता... आता मतदान सुरळीत सुरु असल्याची माहिती निवडणूक सहायक अधिकारी शिवानंदा लंगडपुरे यांनी दिली..
* 8.30 - बीड मतदारसंघात एकूण पाच ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड.. जुओराई, माजलगाव, केज, आष्टी, परळी येथील मतदान केंद्रात बिघाड झाला होता. या सर्व ठिकाणच्या मशीन तत्काळ बदलून मतदान सुरळीत करण्यात आले आहे.
* 7.30 - बीडच्या धारुर तालुक्यातील मोहखेड येथे बुथ क्रमांक. ३१२ चे मशीन तपासणी करतानाच बंद पडले...संबंधित मशीन दुरुस्त करुन मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती निवडणूक सहायक अधिकारी शिवानंदा लंगडपुरेंनी दिली....