बीड : काही दिवसांपूर्वी मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. मणिपूरमधील येथील घटना अजून ताजी आहे. असे असताना बीडमध्येदेखील असाच धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. 25 वर्षीय विधवा महिलेवर दोघांनी बलात्कार केला आहे. 4 ऑगस्टच्या सायंकाळी ही घटना घडली. नेकनूर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन जणांवनर गुन्हा दाखल आहे. अमोल नामदेव लंबाटे, सुरेश नामदेव लंबाटे व सविता सुरेश लंबाटे अशी आरोपींची नावे आहेत.
अतिप्रसंग करण्याच्या हेतूने झटापट : पीडित महिला घराकडे जात होती. तेव्हा एका गाडीतून तिचा प्रियकर व अन्य दोघे तिच्याजवळ आले. तिला उचलून त्यांनी गाडीत टाकले. त्यांनी बार्शी नाक्यामार्गे गाडी सुसाट वेगाने मांजरसुंब्यावर नेली. त्यावेळी गाडीतील दोन नराधमांनी मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या हेतूने झटापट सुरू केली. त्यातील एकाने जबरदस्तीने गाडीमध्येच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसर्याने तिच्यावर अत्याचार केला. तोपर्यंत ही गाडी सात्रापोत्रा येथे पोहचली होती. याठिकाणी संबंधित पीडितेचा प्रियकर त्याच्या पत्नीसह राहतो. प्रियकराच्या घरासमोर गाडी पोहोचताच प्रियकराच्या पत्नीने पीडितेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली.
पीडितेस नग्न करून मारहाण : मिळालेल्या माहितीनुसार, त्या पीडितेस प्रियकर, बलात्कार करणारे दोघेजण व प्रियकराच्या पत्नीने नग्न करून मारहाण केल्याचे सांगितले जाते. मारहाण केल्यानंतर संबंधित पीडितेस सात्रापोत्रा या ठिकाणीच सोडून देण्यात आले. याबाबतची माहिती नेकनूर पोलिसांना समजली. नेकनूर पोलिसांनी संबंधित महिलेस बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 4 ऑगस्टच्या रात्रीच उपचारासाठी दाखल केले, अशीही माहिती समोर येत आहे.
बलात्काराचा गुन्हा दाखल : तब्बल चोवीस तासानंतर घटनेचे गांभीर्य पाहून शिवाजीनगर पोलिसांनी त्या महिलेचा रविवारी सायंकाळी जवाब घेतला. प्रियकरासह बलात्कार करणारे नराधम होळंबे आणि लांबटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहून आरोपी व गुन्ह्यात वापरलेल्या गाडीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणाचा तपास पिंक पथक प्रमुख पोलीस निरीक्षक विलास हजारे हे करत आहेत.
ही घटना घडल्यानंतर महिलेने नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली. संबंधित आरोपी सध्या फरार आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासनाने दोन पथके नेमली आहेत. लवकरच या दोन आरोपींना अटक करण्यात येईल. त्या महिलेला योग्य तो न्याय देण्यात येईल- पोलीस निरीक्षक विलास हजारे
हेही वाचा :