बीड - अवैध मार्गाने वाळू तस्करी करणाऱ्या ठेकेदारावर बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या करवाईनंतर अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच या प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी गोदाकाठच्या वाळू पट्ट्यांमधून वाळू तस्करीसाठी अवैध मार्गाने जमा केलेली शेकडो ब्रास वाळू जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. त्यानंतर ही वाळू जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणून टाकली जात आहे. या कारवाईत जप्त केलेली वाळू शासकीय कामे तसेच बांधकाम विभागांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांसाठी वापरण्यात येणार आहे.