बीड: बीड येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी BJP president Bhagirath Biyani यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली.
बियाणी यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या Suicide by shooting केली आहे. माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांना बीड येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल Phoenix Hospital केले आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपाधीक्षक संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी सानप, ग्रामिण पोलीस ठाण्याचे संतोष साबळे, पेठ बीड पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी धाव घेतली.
बियाणी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांसह भाजप पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी सोमवारी दुपारी राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गोळीबाराचा आवाज आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. नागरिकांनी भगीरथ बियाणी यांच्या घराजवळ मोठी गर्दी केली आहे. बियाणी हे त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बियाणी यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी देखील घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे.