बीड - सद्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा-कॉलेज, महाविद्यालये बंद आहेत. यातच शेतकऱ्यांची मुले शेतामध्ये आई-वडिलांना मदत करत आहेत. अशाच एका 17 वर्षीय मुलाचा कांद्याचे रोप आणण्यासाठी रिक्षाने जाताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शाळा सुरू असती तर, माझा मुलगा वाचला असता, असा टाहो मुलाच्या आई-वडिलांनी फोडला आहे.
ही घटना बीड तालुक्यातील मौजवाडी गावात घडली आहे. 17 वर्षीय नीलेश परमेश्वर बन्सड हा शाळा बंद असल्याने वडिलांना शेती कामात मदत करत होता. त्यातच कांद्याच्या लागवडीसाठी रोपे घेऊन येतो म्हणून मित्राच्या रिक्षात बसून वडवणीकडे जात असताना रस्त्यातच रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात नीलेशचा जागीच मृत्यू झाला.
केंद्र सरकारने नुकतेच राज्यातील शाळा या २१ सप्टेंबरपासून सुरू करण्याविषयी सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक घेतली. त्यात त्यांनी राज्यातील संस्थाचालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - कोरोना नियमांचे पालन करत बीडमध्ये 5 हजार विद्यार्थ्यांनी दिली 'नीट' परीक्षा
हेही वाचा - बदलीचा निरोप समारंभ आटोपून परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू