ETV Bharat / state

जनतेने पंकजा मुंडेंना का नाकारले? पंकजा यांच्या 'या' तीन चुकांची होतीये चर्चा

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच पंकजा मुंडे यांच्या भाषणात जनतेला अहंकार दिसत होता. 2014ला राज्यात मोदी लाट होती याशिवाय बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जनतेने पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निवडून दिले.

पंकजा यांच्या 'या' तीन चुकांची होतीये चर्चा
author img

By

Published : Oct 26, 2019, 2:14 AM IST

बीड - माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे विश्लेषक वेगवेगळ्या बाजूने विश्लेषण करत आहेत. जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांना जनतेने का नाकारले? याबाबत तीन मुद्याभोवती चर्चा होत आहे. पहिला मुद्दा म्हणजे जनतेशी तुटलेली नाळ, अतिआत्मविश्वास आणि अहंकार या तीन गोष्टीमुळे पंकजा मुंडे यांचा 30 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.

मनातल्या मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या नेतृत्वाची अपेक्षा ठेवून काम करणाऱ्या पंकजा मुंडे यांना जनतेने नाकारले आहे. यामागची अनेक वेगवेगळी कारणे राजकीय विश्लेषकांनी सांगितली आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून परळी विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडून परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असे काम पंकजा मुंडे यांच्याकडून झाले नाही, हे खरे आहे. याउलट विरोधी पक्षात असताना धनंजय मुंडे यांनी परळीच्या जनतेची किती कामे केली, यापेक्षा प्रत्येकाशी संवाद धनंजय यांनी कायम ठेवला. याचाच परिणाम पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

'भावनिक राजकारणाला परळीच्या जनतेने लाथाडले'

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच पंकजा मुंडे यांच्या भाषणात जनतेला अहंकार दिसत होता. जे मी करू शकले ते कोणीच करणार नाही. मीच जिल्ह्याचा विकास केला, माझ्यामुळेच रेल्वे आली, मीच ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या करून शिक्षकांना न्याय दिला, मीच दहा हजार कोटी रुपयांची विकासकामे करू शकते. या 'मी' पणाच्या गोष्टींमुळे पंकजा मुंडे यांचा अहंकार स्पष्टपणे जनतेला जाणवला. तिसरी गोष्ट म्हणजे, राजकारणात गाफील राहून चालत नाही. परळी मतदारसंघात बोटावर मोजण्या इतक्याच लोकांचा कोंडवळा घेऊन त्या म्हणायच्या की 'माझा विजय कोणी रोखू शकत नाही. त्यांचा हाच आत्मविश्वास त्यांना नडला.

2014ला राज्यात मोदी लाट होती याशिवाय बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जनतेने पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निवडून दिले. 2019 मध्ये मात्र राज्यातली मोदी लाट ओसरली, याशिवाय भावनिक राजकारणाचा फंडा चालला नाही. परिणामी जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री पंकजा मुंडे यांना जनतेने घरी बसवले, असे राजकीय विश्लेषकांमधून बोलले जात आहे.

हेही वाचा - परळीच्या जनतेचा विश्वास वाया जाऊ देणार नाही- धनंजय मुंडे

Intro:मनातल्या मुख्यमंत्री पंकजा मुंडे यांना का नाकारले जनतेने; पंकजा यांच्या या तीन चुकांची होतेय चर्चा

बीड- माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे वेगवेगळ्या बाजूने विश्लेषण विश्लेषक करत आहेत. जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांना जनतेने का नाकारले? याबाबत तीन मुद्याभोवती चर्चा होत आहे. पहिला मुद्दा म्हणजे जनतेशी तुटलेली नाळ, अतिआत्मविश्वास व अहंकार या तीन गोष्टी मुळे पंकजा मुंडे यांचा 30 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. याउलट धनंजय मुंडे यांनी स्वतः ला जनतेसाठी सतत उपलब्ध ठेवले. परिणामी पंकजा मुंडे यांना जनतेने घरी बसवले.

परळी विधानसभा मतदार संघातून थोडे-थोडके नव्हे तर तब्बल तीस हजारांहून अधिक मतांनी पंकजा मुंडे पराभूत झाल्या. एकीकडे मनातल्या मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या नेतृत्वाची अपेक्षा ठेवून काम करणाऱ्या पंकजा मुंडे यांना जनतेने नाकारले आहे. या मागचे कारण विश्लेषण करताना अनेक राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या बाजूंनी विश्लेषण करत आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून परळी विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो स्वर्गीय मुंडे साहेबांचा निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडून परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असे काम पंकजा मुंडे यांच्याकडून झाले नाही हे खरे आहे शुल्लक कामासाठी नेत्याला भेटणे अथवा काहीच काम नसले तरी सहजतेने त्याला भेटणे वने त्यानेही वेळ देणे ही सवय परळीच्या जनतेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी लावलेली आहे या यामध्ये मात्र पंकजा मुंडे सब असेल सपशेल अपयशी ठरल्या तर दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्यातल्या सामान्य सामान्यातल्या सामान्य माणसाला माणसाची देखील आपली 'कनेक्टिव्हिटी' पाच वर्षात कायम ठेवली. विरोधी पक्षात असताना धनंजय मुंडे यांनी परळीच्या जनतेची किती कामे केली, यापेक्षा प्रत्येकाशी संवाद धनंजय यांनी कायम ठेवला, याचाच परिणाम पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच पंकजा मुंडे यांच्या भाषणात जनतेला अहंकार दिसत होता. जे मी करू शकले ते कोणीच करणार नाही. मीच जिल्ह्याचा विकास केला, माझ्यामुळेच रेल्वे आली, मीच ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या करून शिक्षकांना न्याय दिला, मी च दहा हजार कोटी रुपयांची विकासकामे करू शकते. या 'मी' पणाच्या गोष्टींमुळे पंकजा मुंडे यांचा अहंकार स्पष्टपणे जनतेला जाणवला. तिसरी गोष्ट म्हणजे, राजकारणात गाफील राहून चालत नाही. परळी मतदारसंघात बोटावर मोजण्याइतक्याच लोकांचा कोंडवळा घेऊन त्या म्हणायच्या की 'माझा विजय कोणी रोखू शकत नाही. असे पंकजा मुंडे ठामपणे सांगत राहिल्या, त्यांचा हाच आत्मविश्वास त्यांना नडला. याचाच परिणाम थोडा- थोडक्या नव्हे तर तीस हजारांहून अधिक मतांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना जनतेने पराभूत केले. व राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्या हातात परळी विधानसभा मतदार संघाची सूत्रे दिली.

2014ला राज्यात मोदी लाट होती याशिवाय बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जनतेने पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निवडून दिले 2019 मध्ये मात्र राज्यातली मोदी लाट ओसरली, याशिवाय भावनिक राजकारणाचा फंडा चालला नाही, परिणामी जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री पंकजा मुंडे यांना जनतेने घरी बसवले.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.