परळी (बीड) - वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी २ हजार रुपये बँकेत वर्ग केले आहेत. वेळेवर पैसे मिळाल्याने आनंदित झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कारखान्याचा गळीत हंगाम सध्या जोमाने सुरू असल्याने शेतकऱ्यांत मोठा उत्साह जाणवत व आहे.
एक लाख 16 हजार साखर पोती उत्पादित
१६ डिसेंबरला प्रत्यक्ष गळीत हंगामास सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ४६ दिवसांत कारखान्याने एक लाख ३८ हजार मेट्रीक टन ऊस गाळप केला असून एक लाख १६ हजार साखर पोती उत्पादित केली आहेत. सध्या तीन हजार ८०० मेट्रीक टन दैनंदिन क्षमतेने कारखाना ऊस गाळप करत आहे.
हेही वाचा - आरोपात तथ्य नाही; करुणा शर्मांच्या तक्रारीवर धनंजय मुंडेंचा खुलासा