बीड - महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सुवर्ण पदक विजेता अतिष तोडकर यांचे बीड मधील अष्टीत ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले आहे. अतिष तोडकर यांने कोल्हापूरच्या सुरज आस्वर यांना आखाड्यात धुळ चारली आहे. 57 किलो वजन गटात अतिष तोडकर तसेच सुरज आस्वार यांच्यात झुंझ झाली होती.
कसे पटकावले पदक - माझ्या महाराष्ट्र केसरीच्या सहा फेऱ्या झाल्या. सहाही फेऱ्या मी वन साईड झाल्या. दोन फेऱ्यांमध्ये दोन कोल्हापूरचे तर, एक औरंगाबादचा तसेच एक उस्मानाबादचा होता. आतापर्यंत मी 16 नॅशनल खेळलेलो आहे. आठ वेळा मेडल मिळालेले आहे. इथून पुढे कॉमन वेल्थ इंटरनॅशनल गेम खेळण्याची इच्छा आहे, अशी भावना अतिष तोडकर यांने व्यक्त केली.
ऑलम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न - ऑलम्पिक पर्यंत जाण्याचे माझे स्वप्न आहे, सध्या मी आंतरराष्ट्रीय कुस्तीपर्यंत आमचे मार्गदर्शक दिनेश गुंड यांच्या तालमीत आळंदी येथे सराव करतो आहे. तसेच त्यांनी मला दिल्ली येथे विरेंद्र ॲकॅडमीत सरावासाठी पाठवले आहे. मी जिकंल्याचा सर्वांनाचा अभिमान आहे. मला गाडी बक्षीस मिळाली आहे. प्रथम महाराष्ट्र केसरीमध्ये बक्षीस म्हणून बुलेट गाडी मिळवली आहे. आज माझी सर्व नागरिकांनी आष्टी शहरांमध्ये मिरवणूक काढली. या सर्वांचे श्रेय मी माझ्या वडिलांना देत असल्याचे तोडकर यांनी सांगितले.
माझ्यासाठी वडिलांनी पाच एकर जमीन विकली - 5 एकर जमीन विकून माझ्या वडिलांनी मला कुस्तीसाठी तैयार केले. शिक्षण घेत असताना वडील, आजोबा, चुलते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी वाढलो. कुस्तीमध्ये माझ्या देशाचे नाव मला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे आहे. तसेच माझ्या गावाला माझा अभिमान वाटवा असे काम मी करणार असल्याचा निर्धार तोडकर यांनी केला.
गुंड सरांकडून लहानपणापासूनच कुस्तीचे धडे - आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच जोग महाराज शाळेचे अध्यक्ष दिनेश गुंड यांनी मला लहानपणापासूनच कुस्तीचे धडे दिले. गुंड सरांनी दिल्लीतील वीरेंद्र अकादमीत मला पाठवले. तेथे उत्तम सराव सुरु आहे. त्यांची ईच्छा आहे की, मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावे तसेच देशासाठी पदक जिंकून आणावे.
काय आहेत मोठ्या भावाच्या अपेक्षा - माझ्या धाकट्या भावाने कुस्तीमध्ये बुलेट जिंकली आहे. आतिश तोडकरने 57 किलो वजनी गटात बुलेट ट्रेन जिंकली आहे. आम्ही त्याला आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दरम्यान, सुवर्णपदक विजेता आतिश सुनील तोडकर आष्टी शहरात दाखल होताच मंगरूळ ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले व भव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.