ETV Bharat / state

परळीत होणार तिरंगी लढत, मुंडे बहिण-भावाला देशमुख देणार आव्हान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यावेळेस बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे. विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे या बहिण-भावांसमोर काँग्रेसचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार आहे.

परळीत होणार तिरंगी लढत
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:04 PM IST

Updated : Sep 4, 2019, 11:58 PM IST

बीड - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यावेळेस बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे. विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे या बहिण-भावांसमोर काँग्रेसचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी होणार आहे.

राजेसाहेब देशमुख हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. मराठा बहुल भागातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून देशमुख यांची ओळख आहे. याशिवाय मराठा ठोक मोर्चात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता परळीत मुंडे बहीण-भावाला राजेसाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार आहे. विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने परळी विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिला नव्हता. याचा लाभ पंकजा मुंडेंना झाला होता. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे.

मुंडे बहिण-भावाला देशमुख देणार आव्हान

मुंडे कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात काटे की टक्कर होत असते. मात्र, 2019 ची विधानसभा निवडणुक वेगळी असेल, कारण जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी बहुजन वंचित आघाडी कडून परळीसाठी उमेदवारी मागितली आहे. यामुळे 2019 ची परळी विधानसभा तिरंगी होणार आहे. 2014 ला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केवळ 25 हजार 700 मतांनी पराभूत केले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेत धनंजय मुंडेंचे वर्चस्व
राज्यात परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी असते. मंत्री, पंकजा मुंडे या गेल्या 10 वर्षापासून परळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे, कॉग्रेसकडून प्रा. आर. टी. देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये धनंजय मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता 2014 नंतर मागील पाच वर्षात अनेक राजकीय बदल परळी मतदारसंघात झालेले आहेत. यामध्ये परळी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर धनंजय मुंडे यांचे वर्चस्व कायम आहे. यामध्ये नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य धनंजय मुंडे यांच्या गटाचे आहेत. याचा फटका मंत्री पंकजा मुंडे यांना बसू शकतो.

2014 मध्ये परळी विधानसभा मतदार संघाची निवडणूक बहीण भावात झाली होती. 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. त्यामुळे सहानुभूतीची मोठी लाट होती. मात्र, 2019 विधानसभा निवडणूक वेगळा टप्प्यावर आहे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. बहुजन वंचित आघाडी कडून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे संकेत आहेत. जर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली नाही तर परळी येथील काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. याचा फटका दोन्ही बहिण भावांना बसू शकतो. कारण राजेसाहेब देशमुख मराठा समाजातून पुढे आलेले नेतृत्व आहे. मराठा बहुल भागांमध्ये राजेसाहेब देशमुख यांची चांगली छाप आहे. याचा फटका मंत्री पंकजा मुंडे यांना बसू शकतो. धनंजय मुंडे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे देखील प्रचाराच्या कामाला लागल्या आहेत.

मतदारसंघ पुनर्रचनेत पुर्वीच्या रेणापुर विधानसभा मतदारसंघाचा 2009 साली परळी मतदारसंघ अस्तित्वात आला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांची मजबूत पकड असलेल्या या मतदारसंघात कन्या पंकजा मुंडे या दोन वेळा निवडून आलेल्या आहेत. 2009 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे या 40 हजारांच्या फरकाने निवडून आल्या होत्या. पंकजा यांचे मताधिक्य 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभुती असतानाही 26 हजारावर आले होते. चुलत बंधु धनंजय मुंडे यांनी त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मताधिक्य कमी होवुन भाजपच्या प्रितम मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघातून 18 हजारांचे मताधिक्य आहे.

मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती,बाजार समिती,परळी नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पंकजा व धनंजय या बहीण-भावातील निवडणूक चुरशीची होईल. यातच आता वंचित बहुजन आघाडीकडून राजेसाहेब देशमुख रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे भाजपासमोर मागील १० वर्षात घटत असलेले मताधिक्य टाळण्याचे मोठे आव्हान आहे.

2014 च्या विधानसभेत अशी पडली होती मते-
2014 च्या विधानसभा मतदानावेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्याबाबतची प्रचंड सहानुभूती होती. 2014 मध्ये पंकजा मुंडे( भाजप) यांना 96 हजार 904 तर धनंजय मुंडे ( राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 71 हजार 9 तर प्राध्यापक टी.पी. मुंडे( काँग्रेस) यांना 14 हजार 496 मते मिळाली होती.

असा आहे परळी मतदार संघ-
परळी व अंबाजोगाई तालुक्यात विस्तारलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 337 एवढे मतदार आहेत.
पुरुष मतदार - 1 लाख 53 हजार 901
महिला मतदार - 1 लाख 37 हजार 436
मतदान केंद्र - एकुण 335
परळी तालुक्यात 237 तर अंबाजोगाव तालुक्यात 98 मतदान केंद्र आहेत.

Intro:बातमी सोबत पंकजा मुंडे यांचा बाईट व काही विजवल अपलोड करत आहे. याशिवाय केवळ विजवलची फाईल अपलोड करत आहे..
************

परळीत मुंडे बहिण-भावाला देशमुखांचे आव्हान; दुरंगी वाटणारी निवडणूक होणार तिरंगी

बीड- जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदार संघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुंडे बहीण-भावाला काँग्रेसचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत मराठा बहुल भागातून आलेले नेतृत्व म्हणून पुढे आलेले नेतृत्व म्हणून राजेसाहेब देशमुख यांची ओळख आहे. याशिवाय मराठा ठोक मोर्चात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता परळीत मुंडे बहीण बहीण-भावाला राजेसाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार आहे. विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने परळी विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिला नव्हता. याचा लाभ मंत्री पंकजा मुंडे यांना झाला होता. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे.

मुंडे कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या परळी विधानसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. या मतदारसंघात भाजप च्या मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात काटे की टक्कर होत असते. मात्र 2019 ची विधानसभा निवडणुक वेगळी असेल, कारण जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी बहुजन वंचित आघाडी कडून परळीसाठी उमेदवारी मागितली आहे. यामुळे 2019 ची परळी विधानसभा तिरंगी होणार आहे. 2014 ला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केवळ 25 हजार 700 मतांनी पराभूत केले होते.

राज्यात परळी विधानसभा मतदार संघाची निवडणूक लक्षवेधी असते. मंत्री पंकजा मुंडे या गेली 10 वर्ष पासून परळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून धनंजय मुंडे, कॉग्रेस कडून प्रा. आर. टी. देशमुख यांनी निवडणूक लढवली. यामध्ये धनंजय मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता 2014 नंतर मागील पाच वर्षात अनेक राजकीय बदल परळी मतदारसंघात झालेले आहेत. यामध्ये परळी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर धनंजय मुंडे यांचे वर्चस्व कायम आहे. यामध्ये नगर पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य धनंजय मुंडे यांच्या गटाचे आहेत. याचा फटका मंत्री पंकजा मुंडे यांना बसू शकतो.

2014 मध्ये परळी विधानसभा मतदार संघाची निवडणूक बहीण भावात झाली होती. शिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. 2014 दरम्यान नुकतेच गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. त्यामुळे सहानुभूतीची मोठी लाट होती. मात्र 2019 विधानसभा निवडणूक वेगळा टप्प्यावर आहे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. बहुजन वंचित आघाडी कडून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे 2019 ची परळी विधानसभा तिरंगी लढत होण्याची श्यक्यता आहे. जर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली नाही तर परळी येथील काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील याचा फटका दोन्ही बहिण भावांना बसू शकतो. कारण राजेसाहेब देशमुख मराठा समाजातून पुढे आलेले नेतृत्व आहे. नुकत्याच परळी येथे झालेल्या आरक्षण मागणीच्या आंदोलनात राजेसाहेब देशमुख यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात मराठा बहुल भागांमध्ये राजेसाहेब देशमुख यांची चांगली छाप आहे. याचा फटका मंत्री पंकजा मुंडे यांना बसू शकतो. धनंजय मुंडे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे देखील प्रचाराच्या कामाला लागल्या आहेत.

मतदारसंघ पुनर्रचनेत पुर्वीच्या रेणापुर विधानसभा मतदार संघाचा 2009 साली परळी मतदार संघ अस्तित्वात आला भाजपा नेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची मजबूत पकड असलेल्या या मतदार संघात कन्या पंकजा मुंडे या दोन वेळा निवडुन आलेल्या आहेत.2009 च्या निवडणुकीत 40 हजारांच्या फरकाने निवडुन आलेल्या पंकजा यांचे मताधिक्या 2014 साली गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची सहानुभुती असतानाही 26 हजारावर आले चुलत बंधु धनंजय मुंडे यांनी त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले असुन हेच मताधिक्य नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आणखी कमी होवुन भाजपाच्या प्रितम मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघातून 18 हजारावर आले आहे.मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती,बाजार समिती,परळी नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळविलेले घवघवीत यश यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत पंकजा व धनंजय या बहीण-भावातील निवडणुक चुरशीची होईल. यातच आता वंचित बहुजन आगाडीकडून राजेसाहेब देशमुख रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे भाजपासमोर मागील दहा वर्षात घटत असलेले मताधिक्याचे टाळण्याचे मोठे आव्हान आहे.

2014 च्या विधानसभेत अशी पडली होती मते-

2014 च्या विधानसभा मतदानावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच निधन झाले होते त्यांच्या बाबतची सहानुभूती प्रचंड प्रमाणात होती 2014 मध्ये पंकजा मुंडे( भाजप) यांना 96 हजार 904 धनंजय मुंडे ( राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 71 हजार नऊ तर प्राध्यापक टी.पी. मुंडे( काँग्रेस) यांना 14 हजार 496 पडली होती. शिवसेनेने आपला उमेदवार पंकजा मुंडेंच्या मुळे दिला नव्हता.

असा आहे परळी मतदार संघ-

परळी व अंबाजोगाई तालुक्यात विस्तारलेल्या परळी विधानसभा मतदार संघात एकुण 2 लाख 91 हजार 337 एवढे मतदार आहेत.
त्यात 1 लाख 53 हजार 901, पुरुष व 1 लाख 37 हजार 436 ऐवढे स्त्री मतदार
आहेत. एकुण 335 मतदान केंद्र आहेत. परळी तालुक्यात 237 तर अंबाजोगाई
तालुक्यात 98 मतदान केंद्र आहेत.

Body:बConclusion:ब
Last Updated : Sep 4, 2019, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.