ETV Bharat / state

पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोड यांच्या घरी चोरी - अरुण राठोड

चोरी झाली की, जाणीवपूर्वक कोणी हा प्रकार केला. याचा तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोड यांच्या घरी चोरी

author img

By

Published : Feb 15, 2021, 4:49 PM IST

परळी वैजनाथ (बीड) - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधणारे अरुण राठोड यांच्या घरी सोमवारी पहाटे चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी झाली की, जाणीवपूर्वक कोणी हा प्रकार केला. याचा तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोड यांच्या घरी चोरी

गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू-

परळी येथील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. रविवारी या प्रकरणातील संशयित अरुण राठोड व त्याचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गायब झाले होते. सोमवारी सकाळी परत अरुण राठोड यांचे कुटुंबीय घरी आल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे अरुण राठोड यांच्या घरी चोरी झाली आहे. या चोरीत नेमके काय चोरून नेले याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये संशय-

राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. अरुण राठोड यांच्या घरी नेमकी आत्ताच का चोरी झाली ? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. चोरी झाली की, कोणी जाणीवपूर्वक केली. याचा तपास देखील आता परळी ग्रामीण पोलीस करणार आहेत.

हेही वाचा- मराठा आरक्षण : छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.