ETV Bharat / state

सैनिकाचा पोलीस ठाण्यात राडा; पत्नीची तक्रार घेतल्याने केली तोडफोड

मुंडे हा सैन्य दलात नोकरी करतो. अडीच महिन्यांपासून सुटी घेऊन तो गावी आलेला आहे. चिखलबीड ही त्याची सासरवाडी आहे. मात्र, पत्नीसमवेत त्याचे पटत नाही. त्यामुळे त्याची पत्नी वर्षभरापासून चिखलबीडला राहते. सोमवारी त्याने चिखलबीडला जाऊन पत्नीला मारहाण केली. पत्नीने माहेरच्या लोकांसह वडवणी ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन उद्धव मुंडेविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंद झाला.

सैनिकाचा पोलीस ठाण्यात राडा
सैनिकाचा पोलीस ठाण्यात राडा
author img

By

Published : Jun 9, 2021, 6:40 AM IST

बीड- पत्नीची तक्रार नोंदवून का घेतली, या कारणावरुन सैन्य दलातील जवानाने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. यावेळी त्याने पोलिसाला अर्वाच्च शिवीगाळ करुन संगणक व प्रिंटरची तोडफोड केली. ही घटना बीड जिल्ह्यातील वडवणी पोलीस ठाण्यात घडली आहे. या प्रकारानंतर त्या जवानास अटक करण्यात आली आहे. उद्धव शिवाजी मुंडे (३५, रा. चारदरी ता.धारुर) असे त्या सैनिकाचे नाव आहे.

मुंडे हा सैन्य दलात नोकरी करतो. अडीच महिन्यांपासून सुटी घेऊन तो गावी आलेला आहे. चिखलबीड ही त्याची सासरवाडी आहे. मात्र, पत्नीसमवेत त्याचे पटत नाही. त्यामुळे त्याची पत्नी वर्षभरापासून चिखलबीडला राहते. सोमवारी त्याने चिखलबीडला जाऊन पत्नीला मारहाण केली. पत्नीने माहेरच्या लोकांसह वडवणी ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन उद्धव मुंडेविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंद झाला.

गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळताच दुपारी पावणे दोन वाजता तो पोलीस ठाण्यात पोहोचला. माझ्या पत्नीची तक्रार का नोंदवून घेतली, अशी कुरापत काढून त्याने पोलीस नाईक राम बारगजे यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर सीसीटीएनएस कक्षातील संगणक व प्रिंटरची तोडफोड करुन अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान केले. इतर पोलिसांनी सोडवासोडव करुन त्यास ताब्यात घेतले.

न्यायालयीन कोठडी

पोलीस नाईक राम बारगजे यांच्या तक्रारीवरुन उद्धव मुंडेविरुध्द शासकीय कामात अडथळा व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला. उद्धव मुंडेला मंगळवारी वडवणी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले गेले, अशी माहिती सहायक निरीक्षक नितीन मिरकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.