परळी वैजनाथ - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता मंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील प्रभाग क्र.३ मधील नगर परिषदेच्या जागेत बौद्ध धम्म केंद्र विकसित करण्यासाठी १५ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी, तसेच मतदारसंघातील बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक उभारणीसाठी १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर केला आहे.
दरम्यान निधिची तरतूद केल्याने, परळीच्या शासकीय विश्रामगृहात धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड, प्रा. डॉ. विनोद जगतकर, माधव ताटे, सोपान ताटे, महादेव रोडे, अनंत इंगळे, महेंद्र रोडे, नितीन रोडे, भैयासाहेब आदोडे, आबासाहेब आदोडे, विजय कुमार गडले, पंडीत झिंजुर्डे यांची उपस्थिती होती.
विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही
परळी वैजनाथ शहरातील प्रभाग क्र. ३ मध्ये १५.५१ कोटी रुपये खर्च करून बौद्ध धम्म केंद्र विकसित करण्यात येत आहे. तसेच बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथील नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत शब्द दिला होता. त्याप्रमाणे स्मारक उभारणी साठी १.३२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही विकासकामांच्या बाबतीत मतदारसंघात निधीची कमतरता भासू देणार नाही, तुम्ही मागाल ते मी तुम्हाला मिळून देण्याचा प्रयत्न करेल. असं यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.