बीड : सचिन रावसाहेब दिघोळे आपत्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कंत्राटी पंचायत समिती परळी बाळू उर्फ राजू लक्ष्मण किरवले (वय 28) राहणार भीम नगर शिरसाळा अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदारास रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाची तपासणी करून तिसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी व केल्याचा मोबदला म्हणून सहा हजार रुपयाची लाचेची मागणी खाजगी इसम किरवले यांच्यामार्फत शिरसाळा येथे स्वीकारली. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
दोन दिवसापूर्वी दुसरी घटना : निराधार योजनेची फाईल मंजूर करण्यासाठी 1500 रुपयाची लाच घेण्याची घटना घडली. लाच घेताना खाजगी डाटा एंट्री ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 3 कार्यवाही यशस्वी झाल्या आहेत. तर बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये 65 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. बीडच्या शिरूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची फाईल लवकर मंजूर करण्यासाठी 1500 रुपयाची लाच घेताना गणेश राजहंस या खाजगी डाटा एन्ट्री ऑपरेटरला रंगेहात पकडले आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली होती.
1500 रुपयाची लाचेची मागणी : शिरूर तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब येथील तहसील कार्यालयात खाजगी डाटा एन्ट्री ऑपरेटर गणेश राजहंस कार्यरत आहे. त्याने 2 फेब्रुवारी रोजी 1500 रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून तहसील कार्यालयाच्या आवारात पंचासमक्ष प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली होती. सदरील कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप पाटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी पोलीस आमदार श्रीराम गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कार्यवाही केली. त्यानंतर तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला. ही कार्यवाही झाल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. ते तिथून निघून गेले. शिरूर तालुक्यात या वर्षात ही पहिलीच कार्यवाही असल्याने अनेक लाच देणारे व घेणारे यांचे धाबे दणाणले आहेत. बीडमध्ये हे गैरप्रकार उघडकीस आले आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार होण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे.