बीड - अंबाजोगाई येथून लातूरकडे निघालेल्या लातूर डेपोच्या बसचा अपघात झाला. या बसच्या चालकाने रेणापुर पिंपळफाट्या जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या विटांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
शनिवारी रात्री आठ वाजता हा अपघात झाला. धडक जोराची असल्याने अर्धी बस पूर्णपणे चिरली असून अनेक प्रवासी अडकून पडले होते. या दुर्घटनेतील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.