ETV Bharat / state

Commission On Driver Bill In Beed : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बिल काढण्यासाठी मागतात टक्केवारी; उपोषणकर्त्यांचा आरोप - वाहनांच्या बिलासाठी कमिशनची मागणी

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना काळात अधिग्रहण केलेल्या वाहनांचे बिल काढण्यासाठी टक्केवारी मागितली जात आहे. 10 टक्के द्या त्यानंतर बिल घ्या, असे सांगितले जात आहे, असा गंभीर आरोप कोरोना काळात प्रशासनाचा आधार झालेल्या वाहनचालक अन मालकांनी केला आहे. आपल्या वाहनांची बिल मिळावे यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यादरम्यान त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

Commission On Driver Bill In Beed
वाहनचालकांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
author img

By

Published : Jan 26, 2023, 5:21 PM IST

वाहनचालकांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

बीड : उपोषणकर्ते वाहचालक म्हणाले की, मी 500 कोरोना मयतांवर अंत्यसंस्कार केली. आमच्या मेहनतीचे पैसे दिले जात नाहीत; त्यामुळे आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात ज्या वाहन चालकांनी कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींना अग्निडाग देत अंत्यसंस्कार केला, आज त्याच वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 120 वाहनांचे अधिग्रहण केले होते. या वाहन चालकांना अद्यापपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे या वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आर्थिक विवंचनेतून यापैकी एका वाहन चालकाने आत्महत्या देखील केली आहे. मात्र तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांना याचे गांभीर्य उरलेले नाही.

उपासमारीची वेळ: आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वाहनांचे हप्ते न भरल्याने फायनान्स कंपन्यांनी अनेकांची वाहने जप्त केली. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे ? असा प्रश्न आहे. मुलांची फिस भरायला पैसे नाहीत. ज्यावेळी कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीला त्याचा मुलगा देखील हात लावत नव्हता, त्यावेळी त्यांच्यावर आम्ही अंत्यसंस्कार केले. मी 500 पेक्षा जास्त लोकांवर अंत्यसंस्कार केले. मात्र आज हे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आमच्या मेहनतीचे बिल काढण्यासाठी 10 टक्के मागतात. ज्यांनी टक्केवारी दिली त्यांना बिले मिळाली. परंतु, आज आमच्यावर उपासमारीची वेळ आहे. आम्ही पैसे कुठून द्यावेत. त्यामुळे बिले द्या; अन्यथा आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशा व्यथा कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, काम केलेल्या वाहनचालकांनी मांडल्या आहेत.

कामगारांचा मोर्चा : कंत्राटी कामगारांचा खासगीकरणाच्या विरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 30 सप्टेंबर, 2020 रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. 'उमेद' अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती रद्द करण्यात येणार होती. या निर्णयाविरोधात कंत्राटी कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. शासनाच्या धोरणामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचे यावेळी कंत्राटी कामगारांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक एका पत्राद्वारे पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे झाले तर राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात येईल. सध्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आमच्या नोकऱ्या गेल्या तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. हा निर्णय शासनाने तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत उमेद कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

कामगारांचा विचार करा : हे सरकार प्रत्येक शासकीय कार्यालयाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे कंत्राटी कामगारांवर बेकारीची वेळ येत आहे. शासनाने आमच्यासारख्या कंत्राटी कामगारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती.

हेही वाचा : Sneha Kokane Criticized Dr Kayande : याला नंगानाच म्हणत नाही,बॉडी बिल्डर स्नेहा कोकणेंनी कायंदेंना सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.