ETV Bharat / state

बीडमधील साईराम मल्टीस्टेट बँकेच्या सर्व शाखा अचानक बंद; ठेवीदारांची बँकेसमोर गर्दी - बीडमध्ये बँक बंद

Shri Sairam Urban Multistate Bank : बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली. साईराम मल्टिस्टेट बँकेच्या सर्वच शाखा एकाचवेळी बंद झाल्या आहेत. बीडसह इतर जिल्ह्यांमध्ये साईराम मल्टीस्टेट बँकेच्या 20 हून अधिक शाखा आहेत. यामध्ये 150 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती मिळत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 8:07 PM IST

Updated : Nov 21, 2023, 10:33 PM IST

बीड Shri Sairam Urban Multistate Bank : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली. तब्बल 20 शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्यानं ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली. ठेवीदारांनी मोठ्या संख्येनं बँकेच्या समोर गर्दी केली. ठेवीदारांनी विश्वास ठेवावा, एकही रुपया ठेवणार नाही. ठेवीदारांनी एकाच वेळी गर्दी केल्यानं रोकड देण्यात अडचण निर्माण होत असल्यानं थोडा वेळ देण्याचं आवाहन बँकेचे व्यवस्थापक साईनाथ परभणी यांनी केलंय. मात्र, बँक बंद असल्यानं ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट, परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्यानं या पतसंस्था बंद झाल्या आहेत. बीड शहरातील माळीवेस भागात मुख्य शाखा असलेल्या साईराम अर्बन या पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा बंद असल्यानं ठेवीदारांनी मुख्य शाखेसमोर गर्दी केली होती. हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी सध्या बँकेत आहेत.

बँकेचे सर्वेसर्वा परभणे यांची प्रतिक्रिया : बँकेचे सर्वेसर्वा शाहीनाथ परभणे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत आपली बाजू मांडली आहे. गेल्या १३ वर्षांपासून साईराम बँक सुरळीत सेवा देत आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून बँकेसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. तसेच आजपर्यंत जवळपास ४० कोटी रुपये खातेदारांना वाटप केले असल्याचे परभणे यांनी म्हटले आहे. मात्र, काही शाखांमध्ये कॅश कमी असल्याने खातेदारांमध्ये संभम्र निर्माण झाला. खातेदारांनी मला थोडा वेळ द्यावा, मी खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे परभणे यांनी म्हटले आहे.

बँक अधिकारी फरार? : बीडची साईराम अर्बन को-ऑपरेटिव बँक देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. साईराम को-ऑपरेटिव बँकेच्या आतापर्यंत जवळपास 20 हून अधिक शाखा आहेत. या सर्वच्या सर्व शाखा एकाच वेळेला बंद झाल्याने ग्राहक आणि ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ही बँकदेखील पळून गेल्याची नागरिक चर्चा करत आहेत.

हेही वाचा -

  1. Online Gaming Fraud Case : ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरण; आरोपी सोंटू जैनने उघडले होते आणखी तीन लॉकर
  2. एसबीआयमध्ये 8283 ज्युनियर असोसिएट्स पदासाठी मेगा भरती; 'ही' आहे शेवटची तारीख

Last Updated : Nov 21, 2023, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.