ETV Bharat / state

बीडमध्ये अॅड. शफीक शेख यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा, पंकजा मुंडेंच्या अडचणीत भर - अॅड. शफीक शेख

धर्मांध शक्तीबरोबर मुस्लीम समाज कधीच जाणार नाही, अशी भूमिका समाजातील नागरिकांनी घेतल्यामुळे शेख शफिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.

पंकजा मुंडे
author img

By

Published : Apr 15, 2019, 9:22 AM IST

बीड - जिल्ह्याच्या राजकारणाची समिकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. ५ दिवसांपूर्वी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक आणि मुस्लीम समाजामधील मोठे प्रस्त असलेले अॅड. शेख शफिक यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

जैन भवन, बीड येथे ७ एप्रिल रोजी मुस्लीम समाजाची बैठक झाली. या बैठकीला बीड शहर व जिल्ह्यातील मुस्लीम समाजाचे युवक व ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी शेख शाफिक यांनी सर्व मुस्लीम बांधवांचे मत जाणून घेतले. तेव्हा धर्मांध शक्तीबरोबर मुस्लीम समाज कधीच जाणार नाही, अशी भूमिका समाजातील नागरिकांनी घेतल्यामुळे शेख शफिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.

शफिक यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसेंदिवस बीड लोकसभेची लढत अधिक तुल्यबळ होत आहे. शेख शफीक हे विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेले आहेत. केवळ मुस्लीमच नाही तर, इतर समाजामध्येदेखील त्यांच्याबाबत सहानुभूती असलेले नेते अशी ओळख आहे. आमदार क्षीरसागर यांचे खंदे समर्थक आहेत. मात्र, त्यांनी क्षीरसागर यांना बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.

शेख शफिक यांच्या भूमिकेमुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. यापूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील मुस्लीम मते भाजपला पडत होती. मात्र, आता मुस्लीम समाजातील नेते जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत आहेत. क्षीरसागर यांच्यामुळे काही प्रमाणात मुस्लीम मतदान भाजपला होईल अशी शक्यता होती. मात्र, शेख शफिक यांच्या भूमिकेमुळे तशी शक्यता नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

Intro:खालील बातमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे व शेख शफिक यांचा फोटो घ्यावा संबंधित फोटो व्हाट्सअप ग्रुप वर सेंड करत आहे
*************
पंकजा मुंडे यांना दणका; आ. क्षीरसागर समर्थक शेख शफिक यांचा राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना पाठिंबा

बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणाची समिकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. पाच दिवसापूर्वी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी भाजप च्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. मात्र आ. जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक व मुस्लिम समाजामधील मोठे प्रस्त असलेले ॲड. शेख शफिक यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला. शाफिक यांच्या भूमिकेमुळे भाजप च्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना दणका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसेंदिवस बीड लोकसभेची लढत अधिक तुल्यबळ होत आहे.

Body:शेख शफीक हे विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेले आहेत. केवळ मुस्लिमच नाही तर इतर समाजामध्ये देखील त्यांच्याबाबत सहानुभूती असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते आ. क्षीरसागर यांचे खंदे समर्थक आहेत. मात्र त्यांनी आ. क्षीरसागर यांना बीड लोकसभेच्या निवडणुकीपुरता राम राम ठोकला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी तुल्यबळ लढत होत आहे. मतदानासाठी पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पाच दिवसात मोठ्या राजकीय उलथापालथी होत आहेत. आ. जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र आ. क्षीरसागर यांचे खंदे समर्थक यांनी धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबरच बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाज राहील अशी भूमिका जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाआहे. शेख शफिक यांच्या या भूमिकेमुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. यापूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील मुस्लिम मत भाजपला पडत होते. मात्र आता मुस्लिम समाजातील नेते जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत आहेत. आ. क्षीरसागर यांच्या मुळे काही प्रमाणात मुस्लिम मतदान भाजपला होईल अशी शक्यता होती. मात्र शेख शफिक यांच्या भूमिकेत मुळे तशी शक्यता नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

Conclusion:7 एप्रिल रोजी जैन भवन, बीड येथे मुस्लिम समाजाची बैठक झाली. या बैठकीला बीड शहर व जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे युवक व ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी शेख शाफिक यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे मत जाणून घेतले. तेव्हा धर्मांध शक्ती बरोबर मुस्लिम समाज कधीच जाणार नाही. अशी भूमिका समाजातील नागरिकांनी घेतल्यामुळे शेख शफिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सगळ्या परिस्थितीवर मंत्री पंकजा मुंडे कशी मात करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.