ETV Bharat / state

बॉलिवूड उभे करण्यात पवार साहेबांसारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार - गोविंदा

author img

By

Published : Dec 13, 2020, 6:28 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते परळीत सपत्नीक आलेले प्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंदा. अभिनेते गोविंदा व मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

Actor Govinda's presence in Beed on the occasion of ncp leader Sharad Pawar's birthday
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा

बीड - बॉलिवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देण असून याला उभे करण्यात शरद पवार साहेबांसारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार आहे. मुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर असून याचा विकास करण्यात नेतृत्वाचा हातभार असल्याचे प्रतिपादन अभिनेता गोविंदा यांनी केले. महाराष्ट्र सार्वभौम असून महाराष्ट्राने देशाला कला, संस्कृती, इंडस्ट्री अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या विकासात पवार साहेबांचे फार मोठे योगदान असल्याचेही गोविंदा यांनी म्हटले.

गोविंदा

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या संघात हॅरिसचा समावेश, डोक्यावर चेंडू आदळलेल्या खेळाडूची घेतली जागा

धनंजय मुंडे खऱ्या जीवनाचे नायक -

यावेळी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते. ''१९९९ साली गोविंदा परळीत आले तेव्हा म्हणाले होते की, धनंजय मुंडे हा माणूस मोठा होईल. प्रभू वैद्यनाथाचे व परळीतील जनतेचे आशीर्वाद घेऊन आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते काम करत आहेत. परळी ही प्रभू वैद्यनाथ शिवजी यांची भूमी असून, येथे प्रामाणिक पणाने जनतेची सेवा करणारा माणूस नक्कीच ईश्वराच्या कृपेने मोठा होत असतो. जे जीवन धनंजय मुंडेनी सामन्य लोकांना दिले आहे. ते पाहता देव त्यांच्यासोबत आहे. धनंजय मुंडे खऱ्या जीवनाचे नायक आहेत, असेही गोविंदा यांनी म्हटले.

गोविंदा म्हणाले, ''पत्नी सुनीता आहुजा यांच्यासह दुसऱ्यांदा परळीत आलेल्या अभिनेता गोविंदा यांनी २१ वर्षांपूर्वी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी आपल्याला परळीला आणले होते. आज पुन्हा २१ वर्षांनी परळीत आलो, इथल्या लोकांचे धनंजय मुंडे यांच्यावरील प्रेम पाहून धनंजय मुंडे यांचे व्यक्तिमत्त्व आणखी मोठे होईल असा विश्वास व्यक्त केला.'' यावेळी आ. संजय दौंड, जि. प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, मा.आ. पृथ्वीराज साठे गोविंद देशमुख, सोमनाथ आप्पा हालगे, बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, यांसह सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने परळीकर नागरिक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.