ETV Bharat / state

बीड : खून प्रकरणातील कोरोना पॉझिटिव्ह आरोपीचे रुग्णालयातून पलायन

बीडच्या जिल्ह्या रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेत असलेला खून प्रकरणातील आरोपी पळून गेला आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी माहिती दिली.

beed hospital
beed hospital
author img

By

Published : Jul 29, 2020, 12:34 PM IST

बीड - मागील सहा दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेला एका खून प्रकरणातील आरोपी बुधवारी (दि. 29 जुलै) सकाळी जिल्हा रुग्णालयातून पळाला. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, एका खून प्रकरणातील आरोपीचा कोरोना अहवाल 22 जुलैला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत कोरोनाची लक्षणे सौम्य झाल्याने त्याला बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयांमधून शहरातील आयटीआयमधील कोविड सेंटरमध्ये रेफर करण्यात येणार होते. पण, याच दरम्यान त्याने रुग्णालयातून पळ काढला. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आरोपीने जिल्हा रुग्णालयात सहा दिवस उपचार घेतले. कोरोना वॉर्डमध्ये केवळ एक स्टाफ नर्स व तीन वॉर्डबॉय असल्याने वार्ड क्रमांक 5 आणि 6 एकमेकांना जोडलेले आहेत. येथे एकावेळी एक स्टाफ नर्स कार्यरत असल्याने रुग्णांकडे लक्ष देणे अवघड जाते आणि यातून असे प्रकार घडतात. अगदी परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनीही मनुष्यबळाच्या आभावावरून नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी फरार झाला असला तरी आता मुख्य प्रश्न म्हणजे ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे ? कारण पॉझिटिव्ह व्यक्ती आरोपी असल्याने त्याच्या उपचारावेळी पोलिसांची त्या ठिकाणी नियुक्ती असणे गरजेचे असल्याची चर्चा सध्या रुग्णालयात सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.