ETV Bharat / state

बीड : अंबाजोगाई-लातूर रोडवर कार, टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू - accident on ambajogai latur road

अंबाजोगाई-लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक कार, पिकअप टेम्पो आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.

accident of car tempo and two wheeler
accident of car tempo and two wheeler
author img

By

Published : Oct 11, 2021, 7:28 AM IST

बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक कार, पिकअप टेम्पो आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला. भुनम्मा सायन्ना शिरपे (वय 39) असे अपघातात मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते घाटनंदूर येथील शाळेत शिक्षक होते.

असा झाला अपघात -

भुनम्मा शिरपे हे शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच 44 एल 7152) लातूरहून अंबाजोगाईकडे येत होते. ते बर्दापूर पाटीच्या थोडेसे पुढे आले असता, डिझायर कार (एमएच २० बीवाय 9787) आणि पोल्ट्रीच्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पो सोबत त्यांच्या दुचाकीचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात भुनम्मा शिरपे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित कुचेकर (रा. परळी वेस, अंबाजोगाई) आणि डिझायरचा चालक अशोक कदम (३०, रा. आपेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातळीने स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांनी केले आवाहन -

अपघातानंतर काही काळ रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, बर्दापूर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत वाहतूक सुरळीत करून दिली. नवीन महामार्गामुळे वाहने वेगात आहेत. तसेच सिमेंट काँक्रीटच्या टणक रस्त्यामुळे डोके फुटून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवावीत आणि दुचाकीस्वारांनी सतत हेल्मेट वापरावे, असे आवाहन बर्दापूर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा - LIVE UPDATE : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.