ETV Bharat / state

आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून बीड जिल्ह्यातील छावण्यांची अचानक तपासणी

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर एका महिला उपजिल्हाधिकारी यांना चारा छावणीची तपासणी करण्‍यापासून रोखले होते.

बीड चारा छावणी
author img

By

Published : May 13, 2019, 10:03 PM IST

बीड - जिल्ह्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील पथकाने सोमवारी ७० छावण्यांना अचानक भेट दिली. यावेळी जनावरांची संख्या आणि इतर सुविधांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात ६५० हून अधिक चारा छावण्या सुरू आहेत.

बीड चारा छावणी

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर एका महिला उपजिल्हाधिकारी यांना चारा छावणीची तपासणी करण्‍यापासून रोखले. याचाच परिणाम की काय म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. जवळपास २० अधिकाऱ्यांचे एक पथक बीड जिल्ह्यात अचानक आले. पथकाने वेगवेगळ्या तालुक्यातील ७० च्या जवळपास छावण्यांना अचानक भेटी देऊन तपासणी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तपासणी पथकातील अधिकाऱ्यांशी सविस्तर बैठक झाल्यानंतरच ज्या छावण्यांमध्ये जनावरांची तफावत आढळून आली आहे. त्यांच्यावर कारवाई होणार आहे. याबाबत बीड जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असेही संबंधित अधिकारी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Intro:आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून बीड जिल्ह्यातील 70 छावण्यांची अचानक तपासणी

बीड-जिल्ह्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर झालेल्या गैरप्रकार आनंतर आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांच्या पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील 70 छावण्यांना अचानक भेट देऊन तेथील जनावरांची संख्या व इतर सुविधांची तपासणी केली आहे. जवळपास 20 अधिकाऱ्यांचा ताफा बीड जिल्ह्यात दाखल झाला होता. आयुक्त कार्यालयातील पथकाच्या तपासणीत काय आढळले यासंदर्भात मंगळवारी औरंगाबाद येथे बैठक होणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

Body:बीड जिल्ह्यात साडेसहाशे हून अधिक चारा छावण्या सुरू आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर एका महिला उपजिल्हाधिकारी यांना चारा छावणी ची तपासणी करण्‍यापासून रोखले. याचा परिणाम विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याचा प्रत्यय सोमवारी आला जवळपास वीस अधिकाऱ्यांचे एक पथक बीड जिल्ह्यात अचानक आले. व त्यानंतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 70 च्या जवळपास छावण्यांना अचानक भेटी देऊन तपासणी केली.

Conclusion:विभागीय आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी त्या तपासणी पथकातील अधिकाऱ्यांशी सविस्तर बैठक झाल्यानंतरच ज्या छावण्यांमध्ये जनावरांची तफावत आढळून आली आहे. त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसे पाहता बीड जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. असेही संबंधित अधिकारी यांनी ईटीव्ही भारत शी कशी बोलताना सांगितले. आयुक्त कार्यालयाच्या पथका बाबत सविस्तर माहिती विचारण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.