ETV Bharat / state

'घरातील तेल दिवे लावायला वापरायचं तर गोरगरिबांनी खायचं काय'? बीडच्या महिलेचा उद्विग्न सवाल - बीड कोरोना

रविवारी रात्री बीड शहरात उच्चभ्रू सोसायटी व मध्यमवर्गीयांच्या कॉलनीमध्ये बहुतांश घरात दिवे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांनी घरातील विद्युतप्रवाह खंडित केला, ना दिवे लावले.

a women from beed asked question whether they used oil for making food or lighting lamps
'घरातील तेल दिवे लावायला वापरायचं तर गोरगरिबांनी खायचं काय'? बीडच्या महिलेचा उद्विग्न सवाल
author img

By

Published : Apr 5, 2020, 11:23 PM IST

बीड - अगोदरच गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आहे. हाताला काम नाही, जगायचं कसं असा प्रश्न आमच्या समोर आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला पैसे नाहीत. अशा बिकट परिस्थितीत घरातील थोड्या तेलात लाईट बंद करून दिवे लावायचे की, भाजीला वापरायचे? असा गंभीर सवाल उपस्थित केलाय बीड येथील पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या रुक्म्खिणी नागापुरे यांनी.

'घरातील तेल दिवे लावायला वापरायचं तर गोरगरिबांनी खायचं काय'? बीडच्या महिलेचा उद्विग्न सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश एक आहे, हा संदेश संपूर्ण जगाला देण्यासाठी रविवारी रात्री नऊ वाजता सर्वांनी घरातील विद्युत प्रवाह बंद करून दिवे लावा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर कुठे समर्थन तर कुठे टीकादेखील झाली. रविवारी रात्री बीड शहरात उच्चभ्रू सोसायटी व मध्यमवर्गीयांच्या कॉलनीमध्ये बहुतांश घरात दिवे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांनी घरातील विद्युतप्रवाह खंडित केला, ना दिवे लावले.

संचारबंदीदरम्यान हाताला काम नाही. खिशात पैसा नाही. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी चणचण भासते, तर घरातलं तेल दिव्यासाठी वापरणार की, भाजीसाठी असा सवालदेखील अनेकांनी उपस्थित केला आहे. मध्यमवर्गीयांच्या घरांमध्ये मात्र विद्युत प्रवाह खंडित करून दिवे लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.