ETV Bharat / state

आष्टी तालुक्यातील मातावळी डोंगरात सापडला बिबट्याचा कुजलेला मृतदेह

बीडच्या मातावळी परिसरातील डोंगरात वयोवृद्ध बिबट्याचा कुजलेला मृतदेह सापडला आहे. गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा जबडा, हाडे आणि कातडी दिसली. दरम्यान, वनविभागाने 'हा वयोवृध्द बिबट्या आहे. महिन्याभरापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा' असा अंदाज व्यक्त केला आहे. डॉक्टरांच्या अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

बीड
बीड
author img

By

Published : Jun 18, 2021, 3:09 PM IST

आष्टी (बीड) - मातावळी परिसरातील डोंगरातील झाडीत वयोवृद्ध बिबट्याचा कुजलेला मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (18 जून) गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा जबडा, हाडे आणि कातडी दिसली. याची माहिती आष्टी वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. तो बिबट्या महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याचे, तसेच तो वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा; असा दावा वनविभाग अधिकारी शाम शिरसाठ यांनी केला आहे.

अहवालातून स्पष्ट होणार मृत्यूचे कारण

घटनास्थळी वनविभागाने धाव घेतली. वरिष्ठ पशुवैद्यकीय डॉक्टर व टीमला पाचारण केले आहे. बिबट्याचा मृत्यू कशाने झाला असेल, ते वैद्यकीय अहवालातच समोर येईल, अशी माहिती आष्टी तालुका वनविभाग अधिकारी शाम शिरसाठ यांनी दिली आहे.

येथे नेहमी बिबट्याचा वावर

आष्टी तालुक्यात डोंगराळ भाग जास्त आहे. येथे बिबट्याची संख्याही जास्त आहे, असे बोलले जाते. त्यात बीड-सांगवी येथील महादेव दऱ्यातील मंदिराच्या कॅमेऱ्यात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. याची माहिती ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे यांनी दिली होती. मागील घटनेमुळे बिबट्याची दहशत संपूर्ण तालुक्यात आहे. हे बिबटे माणसावर हल्ला करत नाहीत. मात्र, येथे बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाकडून बोलले जात आहे. त्यात हा प्रकार आष्टी-पाटोदा सीमेवर असलेल्या मातावळी डोंगराळ भागातून समोर आला आहे.

दरम्यान, अजूनही एका बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - शिवसेनेचा 55वा वर्धापन सोहळा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ऑनलाइनच्या माध्यमातून संबोधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.