परळी - बीड जिल्ह्यातील परळी शहर येथील स्वाभिमान नगर येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांनी ही कारवाई केली.
'16 मे 2021 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमी मिळाली की, परळी येथील स्वाभिमान नगर येथे एकजण थांबला आहे. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव संदीप भास्कर फड (वय 30, रा. स्वाभिमान नगर, परळी वैजनाथ) असे सांगीतले. त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या कमरेला आतून ठेवलेला एक गावठी पिस्तूल मॅगझीनसह आढळला. त्याला गावठी पिस्तूलचे लायसन्स विचारले. मात्र, त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचे कोणतेही लायसन्स नसल्याचे सांगीतले. यानंतर त्याच्याविरुध्द भास्कर केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला', अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, ही कारवाई परळी शहरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, सुंदर केंद्रे, श्रीकांत राठोड, शरद सुर्यवंशी यांनी केली. पुढील तपास पोलीस जमादार चव्हाण करत आहेत.
हेही वाचा - कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून परस्पर पळवला; गुन्हा दाखल