ETV Bharat / state

धक्कादायक: अंबाजोगाईच्या 'स्वाराती' रुग्णालयातील 56 पैकी 27 व्हेंटिलेटर बंद - Swarati Hospital Ambajogai latest news

कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतरही कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज नसल्याचे भीषण वास्तव सध्या अंबाजोगाईच्या 'स्वाराती' ग्रामीण रुग्णालयात पाहायला मिळत आहे.

स्वाराती रुग्णालय
स्वाराती रुग्णालय
author img

By

Published : Mar 31, 2021, 6:31 PM IST

बीड - एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाचे सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड सेंटर असलेल्या अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयातील 56 पैकी 27 व्हेंटिलेटर बंद स्थितीत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे आरोग्य आणखीन धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासन लॉक डाऊनचा पर्याय अवलंबून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रत्यक्षात आरोग्य विभागाकडे सोयी सुविधा अत्यल्प असल्याने कोरोना रुग्णांच्या उपचाराचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - कामाच्या ठिकाणी महिला संरक्षणाच्या दिशेने एक पाऊल, टास्क फोर्स नेमणार

मृत्यूदरात वाढ
सध्या बीड जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय दिवसेंदिवस मृत्यूदर देखील वाढत आहे. अशी सगळी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना शासकीय रुग्णालयातील कोरोनासाठी म्हणून राखून ठेवलेल्या 56 पैकी थोडेथोडके नव्हे तर चक्क 27 व्हेंटिलेटर बंद असून ते रुग्णांना वापरण्यासारखे नसल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थेतील कोरोना साथीचे निम्मे व्हेंटिलेटर बंद असतील तर आरोग्य प्रशासन कोरोनाबाबतीत किती गंभीर आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. तसाच मृत्यूदर देखील वाढत आहे. अशावेळी कोरोनाशी लढणारी व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आव्हान जिल्ह्याला वर्षभरानंतरही पेलता येत नसल्याचे चित्र आहे. राज्यभरात सध्या ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश दिले जात आहेत, मात्र बीड जिल्ह्यातील 'हायर सेंटर ' म्हणवल्या जाणाऱ्या 'स्वाराती ' ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोनासाठी म्हणून राखून ठेवलेले व्हेन्टिलेटरच बंद असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- पुण्यातल्या धायरी औद्योगिक वसाहतीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

अशी आहे यंत्रसामुग्री-
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वाती रुग्णालयाकडे एकूण 76 व्हेंटिलेटर आहेत. त्यातील 56 कोरोनावरील उपचारासाठी म्हणून राखून ठेवण्यात आले होते. मात्र या 56 पैकी तब्बल 27 व्हेंटिलेटर बंद असल्याचे समोर आले आहे. यावर आता रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून त्यानंतर मार्च एंडच्या मुहूर्तावर त्यासाठी नियोजन समितीच्या निधी मागणी करण्यात आली आहे. 'स्वाराती' ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे आशिया खंडातील मोठ्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक मानले जाते, अशा संस्थेत जर परिस्थिती ही असेल तर कोरोनाशी लढण्यासाठी सरकार खरोखरच किती गंभीर आहे हा प्रश्न निर्माण होत आहे.

पीएम केअरमधील व्हेन्टिलेटरही बिघडले
कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्यातील अनेक रुग्णालयांना पीएम केअर मधून व्हेन्टिलेटरचा पुरवठा करण्यात आला होता. बीडमध्ये जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या 'स्वाराती ' रुग्णालयाला असे व्हेंटिलेटर देण्यात आले होते. याला अजून एक वर्षही झालेले नाही, मात्र इतक्यातच स्वाराती रुग्णालयातील पीएम केअरमधील तब्बल 10 व्हेंटिलेटर बिघडले असल्याची माहिती आहे. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शिवाय आरोग्य विभाग माध्यमांना माहिती देण्यापासून टाळाटाळ करत असल्याचेही दिसून येत आहे.

हेही वाचा- पॅन-आधार लिंक नसेल तर 10 हजारापर्यंत भरावा लागू शकतो दंड; आज शेवटची तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.