आष्टी : आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील ३८ आणि सांगवी पाटण येथील १ असे एकूण ३९ भाविक ५ जुलै रोजी अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) गेले होते. अमरनाथ गुहेजवळ अचानक ढगफुटी (11 devotees who went on a pilgrimage got stuck) होऊन पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली. त्यामुळे यात्रेसाठी गेलेले ११ भाविक बाबा बर्फाणी यांच्या गुहेजवळ अडकले. तर २८ भाविक हे खाली असलेल्या बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप आहेत.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून ३९ भाविक अमरनाथ बाबा बर्फाणी यांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यातील २८ भविक बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप आहे. तर, ढगफुटी होऊन पूरग्रस्तस्थिती निर्माण झाल्याने त्यातील ११ जण हे वरतीच अडकले होते. अडकलेल्या ११ जणांशी संपर्क झालेला आहे. भारतीय सैनिकांच्या एनडीआरएफ जवानांच्या मदतीने त्यांना सुरक्षित स्थळी आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अडकलेल्या ११ जणांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने खाली बालटल या ठिकाणी आणण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच आ.सुरेश धस यांनी अडकलेल्या भावीकांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांना धीर देत काही मदत लागल्यास तात्काळ संपर्क करावा असे आ. सुरेश धस यांनी सांगितले.
अजून २ भाविक वरती हेलिकॉप्टरच्या प्रतीक्षेत: बालटल येथे असलेल्या भाविकाशी 'ईटिव्ही भारतने' संपर्क केला असता. ते म्हणाले की, आम्ही बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप पोहचलो आहोत. मात्र आमचे ११ जण मागे राहिले होते.आम्ही सर्व दर्शन करून परतीला निघालो. त्यात आमच्या सोबत असलेले वयोवृद्ध आणि काही इतर हळुवार चालणारे भाविक मागे राहिले होते. त्यांच्यात आणि आमच्या मध्ये २ ते ३ किलोमीटरचे अंतर होते.त्याचवेळी ढगफुटी झाली आणि ती ११ जणांनी प्रत्यक्ष पाहिली. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आम्ही सर्व सुखरूप आहोत. ११ पैकी ९ जण बालटल येथे हेलिकॉप्टरने आले असून, २ जण हेलिपॅडवर हेलिकॉप्टरच्या प्रतीक्षेत रांगेत थांबले आहेत. अडकलेल्या २ जणांबरोबर आमचा सारखा संपर्क चालू आहे. ते थोड्याच वेळात आमच्या जवळ येतील. तसेच, आपल्या तालुक्यातील देवळाली येथील ५० भाविक देखील बालटल येथे आमच्या जवळ तंबूत सुखरूप आहेत.