ETV Bharat / state

भरचौकात तरुणाची हत्या; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

न्यू हनुमाननगरातील मृत आकाश राजपूत हा सागर केशभट या मित्रासोबत फर्निचरची कामे करायचा. दोन दिवसांपुर्वी कुख्यात गुन्हेगार गणेश रविंद्र तनपुरे (१९, रा. गल्ली क्र. २, न्यू हनुमाननगर) याचे आकाशच्या मित्रासोबत हुसेन कॉलनीत भांडण झाले होते. त्यावेळी तिथे सागरदेखील उपस्थित होता. त्याचा राग गणेशच्या मनात खदखदत होता. रविवारी रात्री सागर आणि आकाश दिसताच त्याने दोघांना गल्लीत रोखले. तनपुरेची परिसरात दहशत असल्यामुळे त्याला पाहून सागर तेथून पळून गेला.

author img

By

Published : Aug 10, 2021, 8:13 AM IST

Updated : Aug 10, 2021, 9:57 AM IST

dead aakash rajput
मृत आकाश राजपूत

औरंगाबाद - गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनीत दोन दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाचा प्रत्यक्षदर्शी असलेला तरुण दिसताच त्याला फिल्मी स्टाईलने मारहाण करुन भरचौकात पाच जणांनी ओढत नेले. तसेच पाच जणांनी लोखंडी रॉड, चाकूने भोसकत आणि दगडाने ठेचून त्याची निर्घूण हत्या केली. हा खळबळजनक प्रकार रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास न्यू हनुमाननगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये घडला. मारहाण सुरू असताना मदतीसाठी टाहो फोडत असलेल्या या तरुणाच्या तोंडात निर्दयी आरोपींनी माती कोंबली. इतकेच नव्हे तर त्याच्या तोंडावर लघुशंका करुन व्हिडीओ काढून मारेकरी पसार झाले. आकाश रुपचंद राजपूत (२१, रा. अजिंक्यनगर, गारखेडा परिसर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी सोमवारी पहाटे पाच जणांना घरातून अटक केली.

accused
आरोपी

काय आहे घटना?

न्यू हनुमाननगरातील मृत आकाश राजपूत हा सागर केशभट या मित्रासोबत फर्निचरची कामे करायचा. दोन दिवसांपुर्वी कुख्यात गुन्हेगार गणेश रविंद्र तनपुरे (१९, रा. गल्ली क्र. २, न्यू हनुमाननगर) याचे आकाशच्या मित्रासोबत हुसेन कॉलनीत भांडण झाले होते. त्यावेळी तिथे सागरदेखील उपस्थित होता. त्याचा राग गणेशच्या मनात खदखदत होता. रविवारी रात्री सागर आणि आकाश दिसताच त्याने दोघांना गल्लीत रोखले. तनपुरेची परिसरात दहशत असल्यामुळे त्याला पाहून सागर तेथून पळून गेला. मात्र, तेवढ्यातच आकाशला पकडून ठेवले. आकाशने आरडाओरड सुरू करताच तेथे गणेशचा भाऊ ऋषीकेश रविंद्र तनपुरे (२१), मेव्हणा राहुल युवराज पवार (२४) आणि संदीप त्रिंबक जाधव (४५, मुळ रा. आंबेडकरनगर) हे तेथे आले. त्यांनी आकाशला ओढतच बाजुला असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेने नेले. तेथे लोखंडी रॉडने मारहाणीला सुरुवात केली. आकाश जमिनीवर कोसळताच गणेशची आई मंगल रविंद्र तनपुरे (४०) हिने त्याला दगडाने मारले. तर गणेश आणि ऋषीकेशने चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आकाश विव्हळत नागरिकांकडे मदतीसाठी याचना करू लागला. मात्र, या गुन्हेगारांनी त्याच्या तोंडात माती कोंबली. त्यामुळे त्याचा आवाजही बाहेर निघत नव्हता. जवळपास दहा मिनिटे हा फिल्मीस्टाईल थरार सुरू होता. मात्र, शेकडो नागरिक केवळ बघ्याच्या भूमिकेत होते.

accused
आरोपी

तनपुरेंच्या नावाने फोडला हंबरडा -

आकाशला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील जमादार बाळाराम चौरे, सुखदेव कावरे आणि पोलीस मित्र अक्षय दाभाडे यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. आकाशला लगेचच पोलीस वाहनातून घाटीत दाखल करण्यात आले. त्यावेळी आकाशचा भाऊ प्रविण आणि आई मथुराबाई हे देखील सोबत आले. घाटीच्या दिशेने जात असताना आकाश प्रचंड विव्हळत होता. आपल्याला अख्ख्या तनपुरे कुटुंबीयांनी मारहाण केली. साहेब त्यांना सोडू नका, असे तो म्हणत होता.

accused
आरोपी

पोलीस आयुक्तांना गुंडाचे आव्हान -

नव्याने शहरात रुजू झाल्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी गुंडागर्दी खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता पोलीस आयुक्तांना १९ वर्षीय नव्या गुन्हेगारानेच आव्हान दिले आहे. हनुमानगरातील या तनपुरे कुटुंबाची परिसरात प्रचंड दहशत आहे. चोरी, मारामारी, अवैध धंद्यांमध्ये हे अख्खे कुटुंब पुढे होते. शेजाऱ्यांना त्रास देणे, पेट्रोल चोरणे, रात्री-अपरात्री कोणाच्याही घरात शिरुन दिसेल ते उचलणे, महिला, मुलींच्या अंगावर हात टाकण्याचे प्रकारही गणेश आणि ऋषीकेश करायचे. त्यामुळे या भागातील नागरिक तनपुरे कुटुंबाला अक्षरश: वैतागले होते.

हेही वाचा - खंडणीचा गुन्हा प्रकरण : प्रदीप शर्माने जामीनअर्ज घेतला मागे

अनेक नागरिकांची घरे विक्रीला -

न्यू हनुमाननगरातील गणेश, ऋषीकेश आणि त्यांची आई मंगल तनपुरे यांच्या दहशतीला परिसरातील नागरिक वैतागले. त्यामुळे अनेकांनी त्यांची अलिशान घरे विक्रीला काढली आहेत. यात एका शासकीय अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. १५ ते ६० लाख रुपयांपर्यंतची ही घरे आहेत. अनेक वर्षांपासून स्थायिक असलेले नागरिक आर्थिक नुकसान सहन करुन परिसर सोडून दुसरीकडे राहायला जाण्याच्या विचारात आहेत.

Last Updated : Aug 10, 2021, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.