औरंगाबाद - मिसरवाडी येथील गल्ली क्रमांक एक येथे घरासमोर पत्नीसोबत बसलेल्या तरुणाला चार जणांनी ओढत नेत गळा दाबून मारहाण केली. ( Four People beat youth misarwadi ) या मारहाणीत ३० वर्षीय तरुणाचा सोमवारी २१ रोजी दहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. ( 30 year youth died in beating by four ) घटनेनंतर सिडको पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सलीम मुस्तफा शहा (वय ३०, रा. गल्ली नंबर एक संघर्ष चौक मिसरवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सलीम हा मिस्तरी काम करतो. सोमवार २१ रोजी सकाळी कामाला गेला. काम संपून सहा वाजता घरी आला. रात्री नऊ वाजता सलीम व त्यांची पत्नी घरासमोर गप्पा मारत बसले होते. यावेळी सुनील प्रभुदास पारधे, सागर प्रभुदास पारधे, मनोज प्रभुदास पारधे, प्रभुदास पारधे या चार जणांनी सलीम याला घराजवळ येऊन बोलावून संघर्ष चौकात आणले. यावेळी सलीम याला शिवीगाळ करून मारहाण केली.
हेही वाचा - Mother Kills baby in Mumbai : बाळ पळवून नेल्याचा बनाव करत आईनेच केली मुलीची हत्या, 'हे' होते कारण
या मारहाणीत सलीम हा बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सलीमच्या भावाच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सलीम यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाची मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
जिवे मारण्याची दिली होती धमकी -
सुनील याने काही दिवसांपूर्वी सलीम यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. यावेळी सलीम याने सुनील याला समजाऊन सांगितले. यावेळी सुनील याने सलीमला जिवे मारण्याची धमकीदेखील दिली होती, अशी माहिती त्यांच्या भावाने दिली.