ETV Bharat / state

विद्यापीठाजवळच्या तलावात आढळला तरुणाचा मृतदेह; अपघात की घातपात कारण अस्पष्ट - औरंगाबाद शहर बातमी

औरंगाबाद येथील विद्यापीठ परिसरातील बंधाऱ्यात एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. या युवकाच्या मृतदेहाला कान नसल्याने घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

तलावाचे पाणी
तलावाचे पाणी
author img

By

Published : Oct 11, 2020, 3:42 PM IST

औरंगाबाद - एका युवकाचा विद्यापीठ परिसरातील बंधाऱ्यात मृतदेह शनिवारी (दि. 10 ऑक्टोबर) आढळून आला आहे. विशेष म्हणजे तीन फूट पाण्यात मृतदेह तरंगत होता तर मृतदेहाला दोन्ही कान नाहीत. शिवाय युवकाला पोहता येत असल्याने त्याचा घातपात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. समाधान बापूराव गोफने (वय-19 वर्षे, रा. भीमनगर, भावसिंगपुरा), असे मृत तरुणाचे नाव आहे.

भावसिंगपुरा येथे आई, समाधान व त्याचा भाऊ, असे तिघे येथे राहतात. मोलमजुरी करून घराचा गाडा चालवितात. शुक्रवारी (दि.9 ऑक्टोबर) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास समाधान घरातून बाहेर पडला. त्याने परिसरातील त्याच्या मित्राकडे जाऊन त्याला एक पॅन्ट दिली. तेव्हापासून तो कोणालाही दिसला नाही. मात्र, शनिवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठ परिसरातील साई ग्राऊंडजवळ असलेल्या एका पाण्याच्या छोट्या बंधाऱ्यात समाधानचे मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी ती माहिती पोलिसांसह समधनच्या नातेवाईकांना कळवली.

माहिती मिळताच त्यांनी तातडीने विद्यापीठ गाठले. त्यावेळी बंधाऱ्यात कमरे एवढेच पाणी होते. मृत समाधानचे दोन्ही कान नव्हते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून शव विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविले. याविषयी नातेवाईकांनी पोलिसांकडे समाधानचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

हेही वाचा - जागतिक टपाल दिनानिमित्त औरंगाबादेत लहान मुलांसाठी पत्रलेखनाचा उपक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.