ETV Bharat / state

वैजापूर पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन मारहाण केल्याचा युवकाचा आरोप

author img

By

Published : Apr 25, 2021, 4:30 PM IST

वैजापूर तालुक्यातील भायगाव येथील युवक राहुल बाळकृष्ण हा शनिवारी रात्री आठ वाजता उशिरा आपल्या आजीला वैजापूर येथे रुग्णालयात डबा देण्यासाठी निघाला होता, त्यावेळी हा प्रकार घडला.

वैजापूर
वैजापूर

वैजापूर (औरंगाबाद) - वैजापूर तालुक्यातील जरूळ फाटा येथे शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका अज्ञात पोलिसाने दारुच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप एका युवकाने केला आहे. वैजापूर तालुक्यातील भायगाव येथील युवक राहुल बाळकृष्ण हा शनिवारी रात्री आठ वाजता उशिरा आपल्या आजीला वैजापूर येथे रुग्णालयात डबा देण्यासाठी निघाला होता, त्यावेळी हा प्रकार घडला.

घटना कथन करताना तरुण

औरंगाबाद-नाशिक महामार्गावर असलेल्या जरुळ फाटा येथे अज्ञात पोलिसांनी मागून येऊन त्याची गाडी थांबवली आणि बेदम मारहाण केल्याचे राहुलचे म्हणणे आहे. पोलीस जास्त नशेत असल्यामुळे त्यांची काठी देखील तेथेच फेकून निघून गेला. राहुल पुराव्यासाठी ती काठी घरी घेऊन आला आहे. सदरील पोलीस कर्मचारी हा वैजापूर पोलीस ठाण्याचा असल्याचा राहुलचा आरोप आहे. या प्रकाराबाबत आपण पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल करणार असल्याचे राहुलने सांगितले. दरम्यान, या संदर्भात वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांना विचारला केली असता. त्या युवकाने तक्रार द्यायला पुढे यावे आम्ही योग्य ती कारवाई करू. मात्र, तो सांगत असलेल्या ठिकाणी कोणी पोलीस कर्मचारी न्हवते, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - केंद्र सरकारने राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवला; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.