औरंगाबाद - वडिलांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत होत नसल्याने तरुण धमकी देत दूरदर्शनच्या टॉवरवर चढला. या तरूणाच्या वडिलांचे यकृत खराब झाले असून उपचारांसाठी मदत होत नसल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. स्थानिक लोक प्रतिनिधी आणि नागरिकांनी त्याची समजुत काढल्यानंतर हा तरूण खाली उतरला. नागरिकांनी वडिलांच्या उपचारासाठी तरुणाला आर्थिक मदत केली.
हे ही वाचा - औरंगाबादेत चाकूने भोसकून पतीची हत्या; पुरावे नष्ट करतानाच पोहचले पोलीस
मंगेश संजय साबळे या तरुणाच्या वडिलांना यकृताचा आजार आहे. त्यासाठी त्याला पैशाची गरज असल्याने त्याने मुख्यमंत्री सहायता निधी मिळविण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांकडे चकरा मारल्या. मुख्यमंत्री सहायता निधी ही मंजूर झाली. मात्र, निधीची रक्कम मिळत नसल्याने त्याने उपोषण केले. तरीही कोणी याची दाखल घेत नसल्याने तरुणाने आज (बुधवारी) टीव्ही सेंटर परिसरातील दूरदर्शनच्या टॉवरवर चढून मी आत्महत्या करीत आहे असे ओरडत होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला अग्निशमन दलाचे पथकही याठिकाणाी दाखल झाले होते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी तरुणाला आश्वासन दिले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तरुणच्या वडिलांच्या उपचारासाठी मदत करु, असे सांगितल्यावर तरुण खाली उतरला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
हे ही वाचा - औरंगाबादच्या माजी महापौरांच्या हाताच्या बोटाला चोराने घेतला चावा
यावेळी नागरिकांनी एक हजार पासून ते एक लाख रुपयापर्यंतची रोख आर्थिक मदत केली.
हे ही वाचा - चक्क जिवंत व्यक्तीची अंत्ययात्रा! पाऊस थांबण्यासाठी अंधश्रद्धेचा कळस