ETV Bharat / state

चोरीच्या घटनांनी वर्ष गाजले; बलात्कार, दुखापत, जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ - aurangabad police

शहरातील विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने वर्षभरात घडलेल्या घटनांचा सोमवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पाढा वाचला.

aurangabad
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद पत्रकारपरिषदेत बोलताना
author img

By

Published : Dec 31, 2019, 12:13 PM IST

औरंगाबाद - शहरातील विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने वर्षभरात घडलेल्या घटनांचा सोमवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पाढा वाचला. वर्षभरात चोरांनी शहरात कहर केला, घरफोड्या, तोतया पोलीस, वाहनचोरी, मोबाईल चोरी तसेच अन्य किरकोळ चोर्‍यांमुळे पोलीस हैरान झाले आहेत. तरीदेखील पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईवर आयुक्त प्रसाद यांनी समाधान व्यक्त केले. पोलीस ठाण्यांची कारवाई यंदा सरस राहिली. बंदोबस्त पार पाडत पोलीस ठाण्यांच्या प्रभारी गुन्ह्यांची उकल केल्याने त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आयुक्तांनी तोंडभरून कौतुक केले.

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद पत्रकारपरिषदेत बोलताना

शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ९ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. वाळूजमधील मृत कमलेश पाणी आणि बेगमपूर येथील मृत शफीक खान यांच्या गुन्ह्यांमध्ये कुठलाही धागादोरा नसताना दोन्ही गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. वाळूज पोलिसांनी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणले आहे. तर, पुंडलिक नगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत ५ गावठी पिस्टल ४८ किलो गांजा, बनावट नोटांचे स्कँडल उघडकीस आणले. तसेच ऑनलाईन पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये संशयित महिलेला अटक करून तब्बल ३२ लाख रुपये सायबर क्राईम शाखेने कॅनरा बँकेला परत मिळवून दिले. तर, ७९ लाख रुपये असलेले खाते गोठविण्यात आले.

ऑनलाईन फसवणुकीच्या आणखी एका प्रकरणात संशयित आरोपी धनेश्वर पोतदार व पिंकू यादव यांना अटक करून ऑनलाईन हडप केलेली ४५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली. पुंडलिक नगर पोलिसांनी २ खुनाचे गुढ उकलून काढले. सिडको पोलिसांनी वाहन चोरांची मोठी टोळी जेरबंद केली. मंगळसूत्र चोरांना देखील सिडको पोलिसांनी जेरबंद केले. मात्र, तोतया पोलिसांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरातून ८३६ वाहने चोरीला गेली आहेत. त्यापैकी केवळ २०० वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तर, एकूण १३७३ चोऱ्यांपैकी केवळ ३४९ चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.

हेही वाचा - वर्षाच्या शेवटी वाढले विमान प्रवासी, नवीन वर्षात पर्यटनाला फायदा होण्याची शक्यता

घरफोड्यांपैकी केवळ ४७ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलीस ठाणे प्रभारी यांना यश आले आहे. जबरी चोरीच्या १४९ घटना घडल्या असून त्यापैकी केवळ ८९ घटना उघड झाल्या आहेत. तर, ४६ महिलांचे मंगळसूत्र चोरांनी हिसकावून नेले. त्यापैकी केवळ १३ महिलांचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून त्यात बर्‍यापैकी सातारा सिडको पुंडलिकनगर पोलिसांना यश मिळाले आहे.

हेही वाचा - औरंगाबादला दोन मंत्रिपदे; अब्दुल सत्तार अन् संदीपान भुमरेंची वर्णी

Intro:शहरातील विविध गुणांचे अनुषंगाने वर्षभरात घडलेल्या घटनांचा सोमवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पाढा वाचला वर्षभरात चोरांनी शहरात कहर केला आहे घरफोड्या तोतया पोलीस वाहनचोरी मोबाईल चोरी तसेच अन्य किरकोळ चोर्‍या मुळे पोलीस हैरान झाले आहेत तरीदेखील पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईवर आयुक्त प्रसाद यांनी समाधान व्यक्त केले पोलिस ठाण्याची कारवाई यंदा सरस राहिली बंदोबस्त पार पाडत पोलीस ठाण्यांच्या प्रभारी गुन्ह्याची उकल केल्याने त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आयुक्तांनी तोंडभरून कौतुक केले

Body:शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने 9 जनावर स्थानबद्ध तिची कारवाई करण्यात आली आहे वाळूजमधील मृत कमलेश पाणी आणि बेगमपूर येथील मृत शफीक खान यांच्या गुन्ह्यांमध्ये कुठलाही धागादोरा नसताना दोन्ही गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले वाळूज पोलिसांनी चोरीचे तेरा गुन्हे उघडकीस आणले आहे पुंडलिक नगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाच गावठी पिस्टल 48 किलो गांजा बनावट नोटांचे स्कॅंडल उघडकीस आणले आहे ऑनलाइन पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये संशयित महिलेला अटक करून तब्बल 32 लाख रुपये सायबर क्राईम कॅनरा बँक केला परत मिळवून दिले तर 79 लाख रुपये असलेले खाते गोठविण्यात आले ऑनलाईन फसवणुकीच्या आणखी एका प्रकरणात संशयित आरोपी धनेश्वर पोतदार व पिंकू यादव यांना अटक करून ऑनलाईन हडप केलेली 45 हजारांची रक्कम परत मिळवून दिली पुंडलिक नगर पोलिसांनी 2 कुणाचे गुड काढले सिडको पोलिसांनी वाहन चोरांची मोठी टोळी जेरबंद केली मंगळसूत्र चोरांना देखील सिडको पोलिसांनी जेरबंद केले मात्र तोतया पोलिसांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरातून 836 वाहने चोरीला गेली आहे त्यापैकी केवळ दोनशे वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे तर एकूण तेराशे 73 चोऱ्या पैकी केवळ 349 चोऱ्या उघडकीस आल्या आहेत घरफोड्या पैकी केवळ 47 घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलीस ठाणे प्रभारी यांना यश आले आहे जबरी चोरीच्या 149 घटना घडल्या आहेत त्यापैकी केवळ 89 घटना उघड झाल्या आहेत तर 46 महिलांचे मंगळसूत्र चोरांनी हिसकावून नेले त्यापैकी केवळ 13 महिलांचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून त्यात बर्‍यापैकी सातारा सिडको पुंडलिकनगर पोलिसांना यश मिळाले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.