ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये सव्वा लाखांचा गुटखा जप्त, एमआयडीसी वाळूज पोलिसांची कारवाई - gutka seized

एका कारमधून वाहतूक करण्यात येणारा १ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सापळा रचून पकडला. हा गुटखा व ३ लाख रुपयांची कार व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

aurangabad
वाळूज पोलिसांनी पकडला सव्वा लाखांचा गुटखा
author img

By

Published : Dec 22, 2019, 10:33 AM IST

Updated : Dec 22, 2019, 11:17 AM IST

औरंगाबाद - एका कारमधून वाहतूक करण्यात येणारा १ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने पकडला. सचिन रामजी जाधव (२२) राहणार श्रीराम नगर रांजणगाव असे आरोपीचे नाव आहे.

वाळूज पोलिसांनी पकडला सव्वा लाखांचा गुटखा

गुटखा, पान मसाला तसेच सुगंधी तंबाखूवर राज्यात प्रतिबंध आहे. असे असताना वाळूज महानगरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू आहे. शनिवारी सकाळी एमायडीसी वाळूज पोलिसांना एका कारमधून गुटखा विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बाबा इंजिनिअरिंग कंपनीजवळील चौकात सापळा रचला.

हेही वाचा - धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार

साडेदहाच्या दरम्यान त्यांना जोगेश्वरीकडून १ कार (एमएच ०४ जीडी ३४५२) भरधाव वेगात येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये सुगंधित पान मसाल्याचे ८०० पाकिटे व जर्दाची ८०० पाकिटे असा १ लाख ३२ हजारांचा गुटखा आढळला. पोलिसांनी हा गुटखा व ३ लाख रुपयांची कार व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी ज्योत्सना जाधव यांच्या ताब्यात दिली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - घाटी रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला रुग्णाच्या नातेवाईकांकडून जबर मारहाण

Intro:एका कारमधून वाहतूक करण्यात येणारा एक लाख बत्तीस हजार रुपयाचा गुटका एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने पकडला सचिन रामजी जाधव वय बावीस राहणार श्रीराम नगर रांजणगाव असे आरोपीचे नाव आहे

Body:गुटखा पान मसाला तसेच सुगंधी तंबाखू यावर सरकारने प्रतिबंध लागू केल्या आहेत.असे असताना वाळूज महानगरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू आहे. शनिवारी सकाळी एमायडीसी वाळूज पोलिसांना माहिती मिळाली की एका कारमधून गुटखा विक्रीसाठी नेण्यात येणार आहे.यावरून पोलिसांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बाबा इंजिनिअरिंग कंपनी जवळील चौकात सापळा रचला होता. साडेदहा वाजेच्या दरम्यान त्यांना जोगेश्वरी कडून एक कार (mh04 जीडी 3452) ही भरधाव वेगात घेताना दिसून आली पोलिसांनी कार थांबवून कारची तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधित पान मसाल्याची आठशे पाकिटे व जर्दा ची 800 पाकिटे असा एक लाख 32 हजार आचा गुटका आढळला पोलिसांनी हा गुटखा व तीन लाख रुपयाची कार व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी ज्योत्सना जाधव यांच्या ताब्यात दिली याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेConclusion:
Last Updated : Dec 22, 2019, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.