ETV Bharat / state

World Men's Day : पत्नीकडून पतीच्या छळाच्या तक्रारीत वाढ, पुरुषांसाठीही असावेत कडक कायदे - divorce

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ज्याप्रमाणे कायदे करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिलांकडून होणाऱ्या अत्याचारापासून पुरुषाचे संरक्षण व्हावे, यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा. प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष सुरक्षा समितीची स्थापन करावी, घरगुती हिंसाचारापासून पुरुषाचे संरक्षण करण्यासाठी नवीन कायदे करण्यात यावेत, अशी मागणी पत्नी पीडित अॅड. भारत फुलारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

World Men's Day
World Men's Day
author img

By

Published : Nov 19, 2021, 7:38 AM IST

औरंगाबाद - विवाहित महिलांचा जसा सासरी छळ होतो. तसाच छळ विवाहित पुरुषांचाही बायकोकडून होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत आहेत. कोरोना काळात पत्नीपीडित पुरुषांच्या ३५० तक्रारी आहेत. मात्र या केवळ १० टक्के तक्रारी असल्याचे पत्नीपीडित संघटनेचे मत आहे. ९० टक्के पुरुष समाज काय म्हणेल, या भीतीपोटी पत्नीविरोधात तक्रार न करता निमूटपणे त्रास सहन करीत राहतो. पीडित पतीच्या वाढत्या तक्रारी पाहता महिलांच्या कायद्याप्रमाणे पुरुषांच्या बाजूने देखील कडक कायदा असावा, अशी मागणी आता वकीलांसह सामाजिक कार्यकर्ते करत आहे.

पत्नीकडून पतीच्या छळाच्या तक्रारीत वाढ,

पुरूषांचा छळ वाढला -

विवाहित पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून भांडणे होतात. या भांडणाचे रूपांतर हाणामारीपर्यंत जाऊन प्रकरण पोलिसांपर्यंत जाते. यातून त्यांचा संसार तुटण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्राप्त तक्रारीची तातडीने दखल घेऊन प्रकरण पोलिसांच्या भरोसा सेलकडे पाठविले जाते. भरोसा सेलचे अधिकारी, कर्मचारी जोडप्याला बोलावून त्यांचे समुपदेशन करतात. या समुपदेशनाला ८० टक्के यश येते आणि जोडप्यांचे मनोमिलन होऊन तुटण्याच्या मार्गावरील संसाराची वेल पुन्हा बहरू लागते. उर्वरित प्रकरणांत तडजोड न झाल्यास विवाहित पत्नी सासरच्या मंडळीविरोधात पोलिसांत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविते आणि न्यायालयात पोटगीचा दावा दाखल करते. विवाहित महिलांप्रमाणेच आता विवाहित पतीकडूनही पत्नीविरोधात छळाच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. दीड वर्षाच्या कालावधीत ३५० पुरुषांचा पत्नी छळ करते. मारहाण करते, शिवीगाळ करते. आई-वडिलांना चांगली वागणूक देत नाही तसेच विवाहबाह्य संबंध आहेत, अशा तक्रारी आहेत.

जागतिक पुरूष दिवस
जागतिक पुरूष दिवस

घटस्फोटात आईचा हस्तक्षेप जास्त -

भारतीय समाजाची बांधणी अतिशय शास्त्रशुद्धरीत्या करण्यात आली आहे. एकत्र कुटुंब पद्धती ही खूप मोठी देण आहे. तिचा न्यास समाजात विविध स्तरांवर परिणाम दाखवत आहेत. वाढत्या घटस्फोटाचे कारण मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप आहे. मुलींना त्यांच्या सासरच्या कुटुंबात रूळू द्या आणि त्यांच्या समस्या त्यांना सोडवू द्या, असा सल्ला अॅड. शुभांगी वक्ते यांनी दिला. व्यक्तिमत्व दोघांच्या लक्षणाचा भाग आहे. मारहाण करणाऱ्या पत्नीच्या मानसिक स्वास्थ्याचे एक कारण असू शकते. जेव्हा पती-पत्नीमध्ये तू-तू मैं-मैं होते. त्यावेळी संसार नीट चालत नाही. यामुळे जोडप्यांनी तू-तू मै-मै न करता आम्ही, आपण असा विचार करायला हवा. काही कारणांमुळे महिला सोशल मीडियावर आभासी मित्रांत गुंतत आहे.

पुरुषाचे संरक्षण करण्यासाठी नवीन कायदे करावे -

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ज्याप्रमाणे कायदे करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिलांकडून होणाऱ्या अत्याचारापासून पुरुषाचे संरक्षण व्हावे, यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा. प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष सुरक्षा समितीची स्थापन करावी, घरगुती हिंसाचारापासून पुरुषाचे संरक्षण करण्यासाठी नवीन कायदे करण्यात यावेत, अशी मागणी पत्नी पीडित अॅड. भारत फुलारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

वर्ष निहाय तक्रारी

  • २०१८ - १०४
  • २०१९ - २३१
  • २०२० - २०२
  • २०२१ - १३१ (जून महिन्यापर्यंत)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.