ETV Bharat / state

दररोज दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून 'तीची' रुग्णसेवा - औरंगाबाद जिल्हा लेटेस्ट न्यूज

कोरोना योद्ध्यांना सर्वतोपरी सुविधा देण्याचा दावा प्रत्येक वेळी केला जातो. मात्र त्या मिळतात का? हा प्रश्न आहे. असं असलं तरी काही कोरोना योद्धे कुठल्याही प्रकारची मदत न घेता, हाल सहन करत आपलं कर्तव्य बजावत आहेत. शासकीय रुग्णालयात काम करणारी एक सफाई कामगार महिला रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून, कोरोना काळात कर्तव्य बजावत आहे. या महिलेचं नाव आहे सुमन मोघे.

सुमन मोघे
सुमन मोघे
author img

By

Published : May 24, 2021, 7:19 PM IST

औरंगाबाद - कोरोना योद्ध्यांना सर्वतोपरी सुविधा देण्याचा दावा प्रत्येक वेळी केला जातो. मात्र त्या मिळतात का? हा प्रश्न आहे. असं असलं तरी काही कोरोना योद्धे कुठल्याही प्रकारची मदत न घेता, हाल सहन करत आपलं कर्तव्य बजावत आहेत. शासकीय रुग्णालयात काम करणारी एक सफाई कामगार महिला रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून, कोरोना काळात कर्तव्य बजावत आहे. या महिलेचं नाव आहे सुमन मोघे.

रोजचा दहा किलोमीटर पायी प्रवास

औरंगाबादपासून 25 किलोमीटरवर असलेल्या बिडकीन शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून सुमन मोघे ह्या गेल्या पाच वर्षांपासून काम करतात. कोविड काळात न थकता त्या आपलं कर्तव्य बजावत आहेत. कामाच्या ठिकाणापासून त्यांच्या घराचं अंतर पाच किलोमीटर इतके लांब आहे. मात्र जाण्या-येण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने, त्यांना रोज जाऊन-येऊन 10 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतोय. पण याचं आपल्याला कधीच दुःख वाटत नसल्याचं सुमन अभिमानाने सांगतात. कारण आज मी जे काम करत आहे त्याचा मला अभिमान असून, सफाई कामगार का होत नाही, पण देशासाठी आपण काहीतरी करत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दररोज दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून 'तीची' रुग्णसेवा

कोरोनामुळे वाहन मिळणेही झाले अवघड

कोरोनाच्या आधी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वाराकडे मदत मागितल्यास रुग्णालयापर्यंत पोहोचण्याची सोय व्हायची, मात्र आता या कोरोना काळात मी रुग्णालयात काम करत असल्याने कोणी मदत देखील करत नाही. पायी यावं लागत असल्याने वेळ जास्त लागतो, म्हणून घरातून सकाळी 7 वाजताच निघावे लागते, पण याचं कधी दुःख वाटत नाही. आज मला जी सेवा करायला मिळत आहे त्याचा अभिमान वाटत असल्याचं सुमन म्हणतात. सुमन यांच्या सारखे अनेक जण आपलं दुःख बाजूला ठेवून, कोरोनाविरोधात खंबीरपणे उभा आहेत, पण त्याचं कधी कौतुक होतं ना कधी त्यांची चर्चा होते, मात्र तरीही ते निस्वार्थपणे आपली सेवा बजावत आहेत.

हेही वाचा - पाळणाघरात ठेवलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर दीड महिने लैंगिक अत्याचार, ५६ वर्षीय नराधम अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.