औरंगाबाद : सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी केलेले कृत्य मला शब्दात सांगता येणार नाही. मात्र ते इतके त्रासदायक होते की आजही रात्री झोप येत नाही. अशा शब्दात आपबीती तक्रारदार महिलेने प्रसिद्धी माध्यमांना सांगितली. पोलीस अधिकारी असलेले ढुमे जबरदस्तीने आमच्या गाडीत बसले. डाव्या हाताने त्यांनी मला स्पर्श केला. गाडीच्या समोरील सीटवर त्या बसल्या असताना मांडीवर मुलगी झोपलेली असल्याने मला जास्त बोलता आले नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडे बंदूक होती. आम्ही जर त्यांना थांबवले असते तर आमच्यापैकी कोणीही जिवंत राहू शकले नसते अशी भीती होती. त्यामुळे त्याबाबत घरी येईपर्यंत काहीही बोलता आले नाही, असे महिलेने सांगितले.
पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याला भेटलो : सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढूमे हे पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. असे पोलिसांच्या नमूद केलेल्या तक्रारी सांगण्यात आले आहे. मात्र पहिल्यांदाच त्यांची भेट हॉटेलमध्ये झाली, ते पोलीस अधिकारी आहेत अशी माहिती मला असल्याने त्यांची भेट मी घेतली. माझ्या नातेवाईकाची प्रकरण अहमदनगर येथे सुरू असून ढूमे त्याआधी नगर येथे पोलीस अधिकारी होते. म्हणून त्यांच्याशी बोलायला गेलो होतो. त्यानंतर ते जबरदस्ती माझ्या गाडीत बसले होते. घरी आल्यावर घरात वॉशरूमला जाण्यावरून त्यांनी वाद घातला आणि मारहाण केली. त्यावेळेस मी माझ्या नातेवाईकांना तिथे बोलून त्यांना समजून सांगण्याबाबत सांगितले, तर त्यांना देखील वाद घालत मारहाण केली. त्यानंतर मी टोल फ्री 112 क्रमांक वर संपर्क करून पोलिसांना बोलावले, असे तक्रारदार महिलेच्या पतीने प्रसारमाध्यमांना सांगितले.
घरात घुसण्याचा केला प्रयत्न : कारमध्ये जबरदस्ती बसल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी घराजवळ आल्यावर माझा दरवाजा उघडला. इतकच नाही तर मुलीला माझ्याकडे द्या, मी घेऊन येतो असे वारंवार म्हणू लागले. त्यावेळेस माझी पती तिथे आले आणि त्यांनी साहेब मी तुम्हाला सोडतो असे म्हणाले. मात्र ते जायला तयार नव्हते. त्यावेळेस मी माझ्या मुलीला घेऊन लगेच घरात आले आणि मुलीला बेडरूममध्ये झोपवले. गॅलरीमध्ये आले असता विशाल ढुमे माझ्या पतीला तुमच्या घरातील वाशरूम वापरू द्या, असे वारंवार सांगू लागले. त्यामुळे मी माझ्या सासूबाईंना त्यांची समज काढण्यासाठी खाली पाठवले. त्यावेळेस माझ्या सासूंनी रिक्षादेखील थांबवली मात्र त्याला देखील विशाल ढुमे यांनी शिवीगाळ करून हाकलून लावले आणि नंतर वाद घालायला सुरुवात केली, असे तक्रारदार महिलेने सांगितले.
पोलीस करत आहे दिशाभूल : रात्री दीड ते दोनच्या सुमारास घडलेल्या प्रकारानंतर सिटी चौक पोलिसात याबाबत तक्रार देण्यासाठी गेलो असता सुरुवातीला सिडको मध्ये जाऊन तक्रार द्या, असे सांगण्यात आले. मात्र सदरील घटना सिटी चौक हद्दीत झाली असून त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे महिलेच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर सकाळी उशिरा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. या घटनेत पोलिसांनी चांगले सहकार्य केले असले, तरी काही बाबतीत दिशाभूल केली जात असल्याचा संशय महिलेच्या पतीने केला आहे. पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्यांना भेटल्यावर देखील मित्र म्हणून मला नमूद करण्यात आले. त्यानंतर मला आमिष दाखवण्यात आली. तर धमकी देऊनही तक्रार मागे घेण्यास सांगण्यात आले. आमच्या जीविताला धोका असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.
खासदार जलील यांनी दिला इशारा : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढूमे यांच्या वर्तनामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना असून, गंभीर गुन्हा असूनही अद्याप सरकारने त्यांना निलंबित का केले नाही, जामीन कसा मिळू शकला, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शहर पोलिस ठाण्याच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी डीजीपी रजनीश सेठ यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला कठोर शिक्षा दिली जाईल अस आश्वासन दिले. पोलीस दलाचे नाव बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित न केल्यास शुक्रवारी सर्व राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन बंद पाळतील आणि क्रांतीचौक ते मिल कॉर्नरवरील सीपी कार्यालयापर्यंत मोर्चा काढतील असा इशारा खासदार जलील यांनी डीजींना दिला.
हेही वाचा : Vishal Dhume Suspended सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे निलंबित