ETV Bharat / state

Aurangabad Crime : विवाहितेची स्कार्फने गळफास घेत आत्महत्या, चिमुकलीच्या रडण्याच्या आवाजाने घटना उघड - woman committed suicide

औरंगाबादमध्ये आनंदनगर गल्ली येथे राहणाऱ्या विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेत महिलेने आत्महत्या केली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Aurangabad Crime
विवाहितेची आत्महत्या
author img

By

Published : Jan 25, 2023, 9:09 AM IST

Updated : Jan 25, 2023, 10:32 AM IST

औरंगाबाद : औरंगाबादेत गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केली आहे. पती नोकरीवर जाताच विवाहितेने दोन वर्षाच्या मुलीला टिव्हीवर कार्टून लाऊन दिले. बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतला. चिमुकलीच्या रडण्याचा सारखा आवाज येत असल्याने शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर धक्कादायक घटना समोर आली. औरंगाबाद शहरातील आनंदनगर भागात समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नाही. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत. रुपाली मयूर गायकवाड वय - 20 वर्षे (रा. आनंदनगर गल्ली क्र ४, शिवाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

विवाहितेने केली आत्महत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेपाच वाजता मृत रुपालीने पती मयूरसोबत जेवण केले. त्यावेळी ती आनंदी होती असे मयूरने सांगितले. जेवण झाल्यानंतर मयूर नोकरीवर कामासाठी निघून गेला. दरम्यान सासू आणि सासरे देखील दुकानावर गेले. दोन वर्षाची चिमुकली आकांक्षा आणि रुपाली दोघेच घरात होते. रुपालीने वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये आकांक्षाला टिव्हीवर कार्टून लाऊन दिले. रुपाली खालच्या मजल्यावर असलेल्या बेडरूममध्ये आली. बेडरूममध्ये स्कार्फच्या मदतीने रुपालीने गळफास घेतला. बराच वेळ उलटून देखील आई दिसत नसल्याने चिमुकली खाली बेडरूममध्ये आली. आईजवळ रडत बसली होती. सुमारे अर्धा तास सतत रडत होती. बराच वेळ झाला आकांक्षा रडत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. आसपासच्या लोकांनी दरवाजा उघडला असता रुपालीने गळफास घेतल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यांना धक्का बसला. काहीक्षण काय करावे ते शेजाऱ्यांना कळले नाही. त्यांनी ही माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : कुटुंबीयांना माहिती समजताच त्यांनी घराकडे धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येत, मृतदेह फासावरून खाली उतरावत रुग्णालयात हलविला. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून रुपलीला मयत घोषित केले. घरात कुठलाही वाद नसताना, आर्थिक अडचण नसताना रुपालीने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. मागील काही दिवसात कुटुंबात काही वाद झाले का? बाहेर कोणासोबत भांडण? किंवा काही कारण आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत. मात्र या विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा : Two Wheeler Theft : पठ्ठ्याने चोरल्या डझनभर दुचाक्या; सीसीटीव्हीमुळे सापडला पोलिसांच्या तावडीत

Last Updated : Jan 25, 2023, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.