ETV Bharat / state

तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; नातेवाईकांची तरुणाच्या आजीला मारहाण - aurangabad suicide

आडुळ तांडा येथील तरुणीला याच तांड्यावरील राम शिवाजी चव्हाण हा तरुण गेल्या चार वर्षांपासून त्रासदेत होता. तिने राम त्रास देत असल्याचे आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे त्यांनी रामला मुलीपासून दुर राहण्यास सांगितले. मात्र, त्याचे त्रास देणे कमी झाले नाही. त्यामुळे तरुणीने रामच्या त्रासाला कंटाळून बुधवारी स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेतली

पाचोड पोलीस ठाणे
author img

By

Published : Oct 13, 2019, 10:54 AM IST

औरंगाबाद - चार वर्षांपासून एकतर्फी प्रेम करत असलेल्या प्रेमवीराच्या त्रासाला कंटाळून आडुळ तांडा (ता.पैठण) येथे एका सतरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी(9 ऑक्टोबर) रोजी सांयकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाच्या आजीला जबर मारहाण केली. यात त्यांचे पाच दात पडले आहेत.

आडुळ तांडा येथील तरुणीला याच तांड्यावरील राम शिवाजी चव्हाण हा तरुण गेल्या चार वर्षांपासून त्रासदेत होता. तिने राम त्रास देत असल्याचे आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे त्यांनी रामला मुलीपासून दुर राहण्यास सांगितले. मात्र, त्याचे त्रास देणे कमी झाले नाही. त्यामुळे तरुणीने रामच्या त्रासाला कंटाळून बुधवारी स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेतली तरुणीला पोहता येत नसल्याने यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी, तक्रारदार बाबासाहेब वाल्मिक राठोड यांनी शुक्रवारी पाचोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - लॉजवर आढळला तरूणीचा मृतदेह, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

घटनेनंतर ज्ञानेश्वर किसन राठोडसह तरुणीच्या इतर नातेवाईकांनी आरोपी राम याच्या 60 वर्षीय आजीला जबर मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या असुन त्यांचे पाच दात पडले आहेत. गंगुबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाचोड पोलीस ठाण्यात संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक युवराज शिंदे, बिट जमादार कल्याण राठोड, फेरोज बरडे करत आहेत.

Intro:एकतर्फी प्रेमविराच्या ञासाला कंटाळुन तरुणीची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या..
संतप्त मुलीच्या नातेवाईकांची तरुणाच्या आजीला जबर मारहाण..
आडुळ तांडा येथील घटना..Body:औरंगाबाद : चार वर्षापासुन एका महाविद्यालयीन तरुणीला एकतर्फी प्रेम

करीत असलेल्या प्रेमविराच्या ञसाला कंटाळुन एका सतरा वर्षीय तरुणीने स्वत:च्या

शेतातील विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आडुळ तांडा (ता.पैठण) येथे

बुधवार (ता.9) रोजी सांयकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त मुलीच्या

नातेवाईकांनी तरुणाच्या आजीला जबरदस्त मारहाण केली यात त्यांचे पाच दात पडले.
आडुळ तांडा येथील एका तरुणीला याच तांड्यावरील राम शिवाजी चव्हाण हा तरुण गेल्या

चार वर्षापासुन तिच्याशी जवळीक साधुन लगट करण्याच्या विविध संधी शोधुन तिला ञास

देत होता. राम चव्हाण हा एकतर्फी प्रेम करीत होता माञ त्या तरुणीला राम वर प्रेम

नसल्याने तिने राम ञास देत असल्याचे आई-वडीलांना सांगीतले त्यामुळे
त्यांनी राम याला

आमच्या मुलीपासुन दुर रहा असे सांगीतले माञ त्याचे ञास देणे कमी झाले नाही त्यामुळे

ञस्त तरुणीने राम याच्या ञासाला कंटाळुन बुधवारी स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी

घेतली तरुणीला पोहता येत नसल्याने तिचा यात मृत्यु झाला. असे फिर्यादी बाबासाहेब

वाल्मिक राठोड यांनी शुक्रवारी (ता.11) रोजी पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या

तक्रारीनुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास

ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस
उपनिरिक्षक

युवराज शिंदे, बिट जमादार कल्याण राठोड, फेरोज बरडे करीत आहे.Conclusion:नातेवाईकांची तरुणाच्या आजीला जबर मारहाण...
घटनेनंतर आरोपी ज्ञानेश्वर किसन राठोड व इतर तरुणीच्या नातेवाईकांनी घटनेनंतर

आरोपी राम यांच्या 60 वर्षीय आजी गंगुबाई फुलसिंग चव्हाण यांना जबर मारहाण केली

यात त्या गंभीर जखमी झाल्या असुन त्यांचे पाच दात पडले आहे. गंगुबाई यांनी दिलेल्या

फिर्यादी नुसार पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.