ETV Bharat / state

धक्कादायक..! औरंगाबादमध्ये घरात घुसून महिलेला जिवंत जाळले

वर्ध्याच्या हिंगणाघाटातील जळीतकांडाची घटना ताजीच असताना सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ही महिला 95 टक्के भाजली आहे.

Aurangabad
घरात घुसून महिलेला जिवंत जाळले
author img

By

Published : Feb 5, 2020, 8:17 AM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका महिलेला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 50 वर्षीय महिला 95 टक्के भाजली आहे. या महिलेला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - हिंगणघाट पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर - डॉक्टर केसवानी

गावातीलच संतोष मोहिते याने या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची माहिती आहे. संतोष मोहिते हा या गावात बियरबार चालवतो.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी वर्ध्यात महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भर चौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असतानाच ही घटना समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड: आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा वकील संघाचा निर्णय

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.