ETV Bharat / state

प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान केल्याच्या रागातून महिलेला मारहाण

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला निवडून का आणले म्हणत महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना वाळूज परिसरात घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान केल्याच्या रागातून महिलेला मारहाण
प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान केल्याच्या रागातून महिलेला मारहाण
author img

By

Published : Jan 23, 2021, 9:47 PM IST

औरंगाबाद - ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला निवडून का आणले म्हणत महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना वाळूज परिसरात घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीचे निकालही लागले. निकाल लागून एक आठवडा उलटला मात्र अजूनही, उमेदवारांमध्ये धुसपूस सुरूच आहे. दरम्यान वाळूज परिसरात राहणाऱ्या एका महिलेला मोतीलाल नवनाथ सुकासे, नवनाथ विठ्ठल सुकासे, कृष्णा देवराव सुखासे, रा. हर्सुली गंगापूर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून का दिले? असा जाब विचारत एका महिलेला मारहाण केली. या महिलेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.